यवतमाळ : वणी येथील भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात एका भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाड वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आणि चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातही उमटत आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपची कोंडी झाली आहे.

या घटनेनंतर मंगळवारी शेकडो कुणबीबांधव वणी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजप कार्यकर्ता सुधीर साळी याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. येथील भाजपचे विद्यमान आमदार तथा उमेदवार बोदकुरवार यांनी व भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रकरणी सारवासारव करत, असा प्रकार घडलाच नाही, असे सांगून घटनेचे खंडन केले आहे. मात्र सध्या वणी विधानसभा मतदारसंघात या प्रकाराने वातावरण ढवळून निघाले असून, या कुणबीबहुल मतदारसंघात भाजपची अडचण वाढली आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
sharad pawar
जातीय जनगणना, आरक्षण मर्यादेवर शरद पवार थेटच बोलले, “मागील तीन वर्षांपासून ..”

हेही वाचा : बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयात सोमवारी साळी या कार्यकर्त्याचा कुणबी समाजाच्या एका कार्यकर्त्याशी वाद झाला. या वादात साळी याने कुणबी समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. एका कार्यकर्त्याने ही माहिती भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यास दिल्यानंतर या पदाधिकाऱ्याने साळी याला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येते. मात्र साळी याने याबाबत कोणाविरूद्धही तक्रार दाखल केली नाही. मात्र एक पत्रक प्रसिद्ध करून कार्यक्रमाच्या आयोजनावरून आपला व एका कार्यकर्त्याचा शाब्दिक वाद झाला होता. आपण कुणबी समाजाविरोधात कुठलेच आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, वणीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घटनास्थळी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. त्यानंतर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कार्यकर्त्यांना समज दिल्याचे सांगण्यात येते. या वादाला आता राजकीय वळण लागले. समाज माध्यमांवरून हे प्रकरण सार्वत्रिक झाल्यानंतर कुणबी समाजाने मंगळवारी रात्री बैठक घेतली. वासुदेव विधाते, राघवेंद्र कुचनकार, जगदीश ढोके, मंगेश रासेकर, अशोक चिकटे आदी शेकडो कुणबी समाजबांधवांनी पोलीस ठाण्यात पोहचून आरोपीस अटक करण्याची मागणी केली. वासुदेव विधाते यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून वणी पोलिसांनी सुधीर साळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : जातीय जनगणना, आरक्षण मर्यादेवर शरद पवार थेटच बोलले, “मागील तीन वर्षांपासून ..”

राजकीय षडयंत्र – बोदकुरवार

याप्रकरणी आता भाजपने हात झटकले आहे. एका कार्यकर्त्याच्या विधानामुळे भाजपची अडचण वाढल्याचे लक्षात येताच येथील महायुतीचे उमेदवार बोदकुरवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून, भाजपच्या प्रचार कार्यालयात असा कुठलाच प्रकार घडला नाही. दोन कार्यकर्त्यांत केवळ धक्काबुक्की झाली. मात्र कोणत्याही समाजाविरूद्ध कोणीही आक्षेपार्ह बोलले नाही. या घटनेशी भाजपचा कोणताचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकार आपल्याविरूद्ध राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप बोदकुरवार यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मात्र अधिक भाष्य करण्याचे टाळले.

Story img Loader