यवतमाळ : शहरालगत मोहा ते बोरगाव धरण घाटात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उजेडात आली. ही विद्यार्थिनी गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा खून झाल्याने कुटुंबीय हादरून गेले आहेत. धनश्री भोला पेठकर (१९, रा. शुभम कॉलनी, वाघापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धामणगाव मार्गावरील एका महाविद्यालयात ती बीएसस्सी द्वितीय वर्षात शिकत होती. ५ डिसेंबर रोजी ती महाविद्यालयात पेपर द्यायला गेली होती. तेव्हापासून ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात ६ डिसेंबर रोजी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलीस व कुटुंबीय शोध घेत असतानाच रविवारी तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा : अमरावती : जखमेवर फुंकर! जावईबापूंना मंत्रिपद मिळाल्‍याचा आनंद…

बोरगाव मादणी घाटातील जंगलात परिसरातून जाणाऱ्या व्यक्तीस तिचा मृतदेह आढळला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तिच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून तिची हत्या करण्यात आल्याचे आढळले. बंद करून ठेवण्यात आलेला मोबाईल, महाविद्यालयाची बॅग मृतदेहाजवळ पडून होती. या नंतर पोलीस धनश्रीच्या घरी चौकशीसाठी गेले तेव्हा सर्व उलगडा झाला. मृतदेह धनश्रीचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पेठकर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. धनश्रीचे वडील येथील रेमंड कपंनीत काम करतात. आई गृहिणी आहे. तिची मोठी बहीण वरोरा येथे एमएसस्सीचे शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर पेठकर परिवार हादरला आहे. मुलीची हत्या कोणी केली असावा, हा प्रश्न या कुटुंबीबियाला सतावत आहे. महाविद्यालयात ती नियमित जायची. कधीही घरी यायला उशीर होत असल्यास कळवत होती. ५ डिसेंबरला पेपर होऊनही ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस करून शोधशोधही केली. ती कुठेच न सापडल्याने तिच्या वडिलांनी ६ डिसेंबरला शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

हेही वाचा : वाघासोबत फोटोसेशन ! लोकांनी पुन्हा वाघाला घेरले…

महाविद्यालयातून पेपर झाल्यानंतर धनश्री बोरगाव धरण परिसरातील जंगलात कोणासोबत गेली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ती बेपत्ता असल्याची तक्रार ६ डिसेंबरलाच केल्यानंतरही पोलिसांनी शोध मोहीम का राबविली नाही, असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू करून एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाजवळ आढळलेल्या तिच्या मोबाईलवरून तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal dead body of a missing college girl found in a forest crushed by stone nrp 78 css