यवतमाळ : येथून जवळच असलेल्या किन्ही या गावी सोमवारी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकृत दौरा कार्यक्रम प्रशासनाकडून आला आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला नाही. या कार्यक्रमास ३५ हजार शेतकरी, लाभार्थी उपस्थित राहतील, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नियमित बससेवा खंडीत करून शेकडो बसेस गावोगावी लाभार्थ्यांना आणण्यास पाठविण्यात आल्या आहेत.

शिवाय खासगी वाहनेही महायुतीच्या तिन्ही पक्षांनी नोंदणी करून ठेवले. प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असताना कार्यक्रमात केवळ मुख्यमंत्रीच उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे अजित पवार या कार्यक्रमास येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा छत्तीसगड येथील दौऱ्यामुळे या कार्यक्रमासाठी येणार नसल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर शक्तीप्रदर्शानाची जय्यत तयारी केली होती. मात्र आता हा कार्यक्रम केवळ शिवसेना शिंदे गटाचाच राहणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा! फडणवीस यांचे मराठा आंदोलकांना आवाहनच  जरांगे यांचे शिंदे यांना निमंत्रण

या कार्यक्रमातून पालकमंत्री संजय राठोड यांचेच शक्तीप्रदर्शन होणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सभास्थळी खिळवून ठेवण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधनासाठी प्रसिध्द असलेल्या सत्यपाल महाराजांचे कीर्तन शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता महाराजांच्या कीर्तनास सुरुवात होणार होती. मात्र या कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून सत्यपाल महाराजांनीही कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविल्याने प्रशासनाची गोची झाली आहे.

हेही वाचा : वर्धा : संघात काय चाललंय याचे माध्यमांना औत्सुक्य – प्रमोद बापट

सत्यपाल महाराजांनी मराठा विरोधी शासनाच्या मंचावर जावू नये, अशी विनंती मराठा समाजाने सत्यपाल महाराजांना केल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे सभेसाठी ग्रामीण भागातून सकाळपासून येणाऱ्या नागरिकांना सभामंडपात कसे गुंतवून ठेवावे, हा प्रश्न आयोजकांना पडला आहे.