यवतमाळ: जिल्ह्यात सध्या चोरी, घरफोडींना उच्छाद मांडला आहे. ‘दिवसा रेकी आणि रात्री चोरी’ अशी पद्धत चोरटे वापरत असल्याने बहुतांश चोरींचा शोध घेण्यात पोलिसही अपयशी ठरत आहे. गेल्या दहा महिन्यांत दीड हजारांवर चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ९७६ वर चोरींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या एका टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. परजिल्ह्यातील चोरटे जिल्ह्यात चोरी करून पळून जातात. हा मुद्देमाल दुसऱ्या जिल्ह्यात विकतात. महिलांच्या गळ्यातील सोने उडविणारे चोरटे परजिल्ह्यातील आहेत. केवळ बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने उडविणाऱ्या महिलांची टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. गेल्या दहा महिन्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या आणि दुचाकी चोरीचे एक हजार ६४२ गुन्हे घडले आहे. यात १३ दरोडे, ७८ जबरी चोरी, १८४ घरफोडी, एक हजार ४० चोऱ्या, ३२७ दुचाकी चोरीच्या घटनांचा समावेश आहे.

हेही वाचा… अकोला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान

आतापर्यंत पोलीस पथकाला जबरी चोरीचे २०, घरफोडीचे १२०, ६०९ चोरी व २२७ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या बॅगमधून चोरट्याने एक लाख ४५ हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख चार हजार ५०० रुपये असा एकूण एक लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मेनलाईनमधीन वननेस कलेक्शनमध्ये गुरुवारी घडली. अशा घटना जिल्ह्यात सर्वत्र दररोज घडत आहे. मात्र पोलीस यंत्रणा अनेक प्रकरणांत चोरींचा माग काढण्यात अपयशी ठरत असल्याने, हा चिंतेचा विषय झाला आहे.

अल्पवयीन मुलांचा वापर

चोरीच्या गुन्ह्यात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग आढळून येत आहे. अट्टल चोरटे व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणत आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर जिल्ह्यातील चोरटे लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ करून पसार होत असल्याने त्यांना अटक करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal district 1500 cases of theft and burglary were committed nrp 78 dvr
Show comments