यवतमाळ : ‘कोणत्याही गुलामगिरी विरूध्द लढणे हा पवित्र लढा आहे. गुलामगिरीने जीवन न जगता गुलामगिरी विरूध्द लढून गुलामगिरी नष्ट करूया’, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबईच्या व्हीजन रेस्क्यु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा न्यायालयात आज शनिवारी ‘वॉक फॅार फ्रिडम’ या मानवी तस्करी व गुलामगिरी विरोधी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी न्या. हांडे बोलत होते. त्यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लऊळकर, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, अॅड. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा सरकारी वकील निती दवे, व्हीजन रेस्क्युचे रिज्जु चरियन आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “अजित पवार हे नक्कीच मुख्यमंत्री होणार,” माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे विधान

या रॅलीत यवतमाळ मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी महाविद्यालयाचे प्राध्यापक सहभागी झाले होते. रॅलीकरीता येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, महात्मा जोतीबा फुले कॉलेज ॲाफ सोशल वर्क, यवतमाळ तसेच अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ आणि नेहरू युवा मंडळ यवतमाळ, पॅरा विधी स्वंयसेवक सहभागी झाले होते. संचालन वकील जयसिंग चव्हाण यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal district court walk for freedom rally held against human trafficking and slavery nrp 78 css