यवतमाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते अडविले जात असल्याने वाहतूकीस अडथडा निर्माण होण्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व मार्गांवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आमरण उपोषण, निदर्शने, मोर्चे निघत आहेत. गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाडा-विदर्भ सीमेवर उमरखेड तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी बस अडवून पेटवून दिली. यात जीवितहानी झाली नसली तरी बसचे नुकसान झाले.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”

हेही वाचा : नागपुरातील टेकडी गणेश मंदिरातील झाड सुकल्याने भक्त काळजीत

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सामाजाच्या आमरण उपोषणासह २७ ठिकाणी साखळी उपोषण व २० पेक्षा अधिक गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. मागील दोन ते तीन दिवसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्याच्या घटना घडल्या आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा विस्तार व सीमाभाग मोठा असल्याने अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगामुळे पोलीस विभागास तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध होणे अडचणीचे ठरते. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा : “भाजपचे हिंदूराष्ट्र मनुस्मृतीवर आधारित!” प्रा. श्याम मानव यांची टीका, म्हणाले…

महामार्गावरील रास्ता रोको दरम्यान जमावाद्वारे अचानक हिंसक कारवाया होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय, राज्य महामार्ग व इतर मार्गाकरिता बंदी घालणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व मार्गांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे आवश्यक असल्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी दिला. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर व इतर मार्गांकरीता पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी पोलीस विभागास दिले आहेत.