यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील २ हजार २२५ मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’ कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी रात्रीपर्यंत यवतमाळात पोहोचल्या. येथील दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात या ईव्हीएम ठेवण्यात आल्या असून पुढील ३६ दिवस कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही मतदान यंत्रे राहणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे ‘जागते रहो’ अभियान सुरू झाले आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्याानत तब्बल ६२.८७ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण १.७८ टक्क्यांनी वाढले आहे. मतदानानंतर मतमोजणीत ३८ दिवसांचे अंतर आहे. शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर राळेगाव, दिग्रस, पुसद, वाशिम, कारंजा आणि यवतमाळ येथील मतदान यंत्रे यवतमाळात शनिवारी कडेकोट सुरक्षेत आणाण्यात आली. येथील शासकीय गोदामांत ही यंत्रे ठेवण्यात आली असून, त्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असलेली ‘स्ट्राँग रूम’ तयार करण्यात आली आहे.

parinay fuke on anil deshmukh
“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
attack on Anil Deshmukh, katol assembly constituency, salil deshmukh, maharashtra assembly election 2024,
अनिल देशमुखांवरील हल्ल्यामागील रहस्य… काय घडले नेमके?
Assembly Election 2024 Nagpur district one lakh new young voters
एक लाख नवे तरुण मतदार, नागपूरच्या विधानसभा निकालांवर मोठा परिणाम?
attack on BJP candidate Pratap Adsads sister archana rothe
भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्‍या बहिणीवर हल्‍ला, राजकीय वर्तुळात खळबळ
Nagpur Rural SP Harsh Poddar
Anil Deshmukh Injured: अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “घटनेमागील तथ्य…”
devendra fadnavis marathi news
औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला – फडणवीस
anil Deshmukh seriously injured
Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ
why does collector show finger of ink before the voting
Maharashtra Assembly Election 2024 : मतदान होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी शाईचे बोट का दाखवितात?
girl raped and killed by her boyfriend in umred
उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून, मृतदेह आढळल्याने खळबळ

हेही वाचा : नवलच! दोघेही म्हणतात एक लाखाने विजयी भव; लढत चुरशीची ठरली

आता पुढील ३६ दिवस या ठिकाणी चोवीस तास यंत्रणांची नजर राहणार आहे. या परिसरात चारही बाजूने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. यात प्रथम स्तरात सेंट्रल आर्म पोलीस फोर्स (सीएपीएफ), दुसऱ्या स्तरावर स्टेट आर्म पोलीस फोर्स (एसएपीएफ) आणि तिसऱ्या स्तरावर सर्व प्रवेश द्वारांवर स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारही बाजूने मचाणी उभारण्यात आल्या असून, त्या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परिसरात जवळपास ३६ सीसीटीव्ही कॅमेरे विविध अँगेलने बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण कक्षातून चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा : मतांचा वाढीव टक्का, कुणाला धक्का ? आकडेवारीवरुन जय-पराजयाचे फड…

दारव्हा मार्गावर सतत वर्दळ असल्याने दूरपर्यंत नजर ठेवणारा फिरता कॅमेराही या परिसरात बसविण्यात आला आहे. या स्ट्राँगरूमलाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह निवडणूक विभागाच्या निरीक्षकांनी भेट देवून पाहणी केली. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्राँगरूमला ‘सील’ करण्यात आली. या परिसरात राजपत्रित अधिकाऱ्यांची २४ तास तीन शीफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आली आहे.