यवतमाळ : जिल्ह्यातील वणी शहरातील शास्त्री नगर येथील एका कुटुंबातील बाप लेकास सापाने दंश केला. या घटनेत एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, वडिलांची प्रकृती गंभीर आहे. दक्षित सुमित नेलावार असे मृत बालकाचे नाव आहे, तर सुमित नेलावार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वणी येथे शहरातील शास्त्री नगर परिसरातील वास्तव्यात असलेले नेलावार कुटुंबीय बुधवारी रात्री गाढ झोपेत होते. वडील सुमित नेलावार, मुलगा दक्षित नेलावार यांच्यासह सुमितची पत्नी व मुलगी हे घरात झोपून होते. दरम्यान वडील सुमित आणि दक्षितच्या अंथरुणात विषारी साप शिरला व या विषारी सापाने दोघांना चावा घेतला.

हेही वाचा : खळबळजनक! संतनगरीत बालकाचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोतडीत…बुलढाणा जिल्हा लागोपाठच्या घटनांनी हादरला

वेदना असह्य झाल्याने चिमुरडा दक्षित रडू लागला. यामुळे संपूर्ण परिवाराला जागा झाला. यावेळी घरात विषारी साप आढळला. त्यामुळे या दोघांनाही सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान दोघांनाही तत्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून दोघांनाही चंद्रपुर येथे उपचारासाठी रवाना केले. दरम्यान प्रवासाताच चिमुरड्या दक्षितचे निधन झाले. त्याचे वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर घरात लपून बसलेल्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले.

घरात साप येऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी

सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. या काळात बिळात पाणी शिरत असल्याने साप बाहेर पडतात. शेतात पिकातही मोठ्या प्रमाणात साप शिरत असल्याने शेतकऱ्याना सर्पदंश होण्याच्या घटना वाढल्या आहेत. घराच्या आवारात, घरात साप शिरून दुर्घटना घडत आहेत. या दुर्घटना घडू नये यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : दानशूर मिळेल का दानशूर… विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍नेहभोजनासाठी शिक्षकांकडून शोध सुरू

  • घरामध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते. त्यामुळे
    घराच्या भिंती व कुंपणाच्या भिंती यांना पडलेले छिद्र बुजवावेत.
  • घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.
  • घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवाव्यात.
  • गवतातून चालताना पायात बूट असावेत. अंधारात जाताना नेहमी बॅटरी सोबत बाळगावी.
  • रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपू नये, कारण साप हे निशाचर असतात आणि त्यांचा वावर रात्रीला असतो.
  • जमिनीवर झोपायाचे असल्यास अंथरूण भिंतीलगत न लावता मध्य भागी लावावे. सापांना कोपऱ्यात अंधारातून जाणे आवडते.
  • जर आपण आणि साप समोरा- समोर आलो तर घाबरून न जाता स्तब्ध उभे राहवे. शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापाच्या बाजूला फेकावी. साप त्या वस्तुकडे आकर्षित होतो आणि तेवढ्याच वेळात आपण निघून दूर जाऊ शकतो.