यवतमाळ : कापूस तसेच सोयाबीनची हमी भावानुसार खरेदी करण्यात यावी तसेच जिल्ह्यात कापूस संकलन केंद्र सुरु करण्यात यावे, या मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी वारकरी संघटनेने आज शनिवारी काळी दिवाळी साजरी करत आंदोलन केले.

यावेळी शेतकऱ्यांनी घरून आणलेली खात कापसाची आयात बंद करा, असे नारे दिले. सरकारने कापूस खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सण साजरा करण्याकरीता तसेच गरजा भागविण्याकरीता कापूस तसेच सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना विकत आहे.

हेही वाचा…अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला

शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेत आधारभूत किंमतीपेक्षाही कमी भागात कापूस तसेच सोयाबिनची खरेदी केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी ही लुट थांबवावी तसेच तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी शेतकरी वारकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हे शिदोरी आंदोलन करण्यात आले.

शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. केद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. दिवाळीच्या दिवशी संपूर्ण भारतात नागरीक गोड पदार्थ खाऊन दिवाळी साजरी करतात. शेतकऱ्यांनी मात्र गोड पदार्थाचा समावेश नसलेली शिदोरी खाऊन सरकारचा निषेध केला. सरकारने पिकमालाची आधारभूत किंमत कमी ठेवल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरीकडे या आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना देऊन व्यापारी लुट करीत आहे.

हेही वाचा…बुलढाणा : चिखली मतदारसंघात, बसप उमेदवारावर हल्ला…

ही लुट दर्शविणारे अनेक व्हिडीओ आता समाज माध्यमांवर प्रसारित आहेत आहेत. सरकारी यंत्रणा मात्र याकडे गंभीरतेने बघत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांची लुट होऊ नये म्हणून सीसीआय तसेच नाफेडची खरेदी सुरु करण्यात यावी. जिल्ह्यात १० ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून ही संख्या वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी आली. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सोळा तसेच काही मोठया तालुक्यात दोन खरेदी केंद्र सुरू करावे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या

या शिदोरी आंदोलनाची माहिती देऊनही एकही सरकारी अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त् केला. या आंदोलनात विजय निवल, अशोक भुतडा, पवन थोटे, प्रविण कांबळे, बाळासाहेब जिवने, श्रीराम डंगारे, दादाराव घोडे, रामदास शिंदे, दिपक मडसे पाटील, अविनाश रोकडे, विश्वनाथ फुफरे, रुशांत पिंपळकर, नारायण अगलधरे, ना.बा. आगलावे, मोरे महाराज, मनोज पाचघरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.