यवतमाळ : बदललेल्या हवामानाचा फटका यवतमाळ जिल्ह्यात बसला. सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे तुर आणि कापसाला फटका बसला आहे. रविवारी जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री यवतमाळसह उमरखेड आदी तालुक्यात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. काहीवेळ मुसळधार पाऊस कोसळला.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असून रिमझिम पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसाने शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. खरिपातील अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसताना अवकाळीचे हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.