यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात ६२.८७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ६८.९६ टक्के मतदान आदिवासीबहुल राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. मात्र, यवतमाळसारख्या शहरी भागात मतदान कमी का झाले, यावर आता चर्चा रंगत आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत १.७८ टक्क्यांनी वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदारांपैकी १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात सहा लाख ५५ हजार ६५८ पुरूष मतदारांनी आणि पाच लाख ६४ हजार ५०८ महिला मतदारांनी आणि इतर २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाशिम विधानसभा मतदारसंघात दोन लाख १५ हजार ९४८ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी एकूण मतदारांच्या ६०.५६ इतकी आहे. कारंजा मतदारसंघात एक लाख ८७ हजार ४२ इतके मतदान झाले. ही टक्केवारी ६०.९८ इतकी आहे. राळेगाव मतदारसंघात एक लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६८.९६ इतकी आहे. यवतमाळ मतदारसंघात दोन लाख १२ हजार ४८४ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५९.४६ इतकी आहे. दिग्रस मतदारसंघात दोन लाख २० हजार सहा मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६६.६१ इतकी आहे, तर पुसद विधानसभा मतदारसंघात एक लाख ९० हजार ७३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी ६१.७९ टक्के इतकी आहे.

हेही वाचा : ‘वाढीव’ मतदान कोणाला तारक? तिघा प्रमुख उमेदवारांचे विजयाचे दावे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १९ लाख १६ हजार १८५ इतके मतदार होते. त्यापैकी ११ लाख ७४ हजार ८२४ मतदारांनी मतदानाचा अधिकारी बजावला होता. त्यावेळी मतदानाची टक्केवारी ६१.०९ टक्के इतकी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत यानिवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत १.७८ इतकी वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळीपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी असल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक होती. मात्र शनिवारी अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यापासून उमदेवारांमध्येही विजयाची चुरस निर्माण झाली आहे. राळेगावसारख्या आदिवासीबहुल भागातील वाढलेले मतदान आणि सुशिक्षित व शहरी मतदार असलेल्या यवतमाळ मतदारसंघात मतदान कमी झाल्याने ग्रामीण मतदारच अधिक सुशिक्षित असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.