यवतमाळ : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलेच सहकारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर, ‘ते आरक्षणाच्या मुद्यावरून विनाकारण वादळ उभे करत आहेत’, असा थेट आरोप केला. भजबळांकडून ही अपेक्षा नव्हती, असेही विखे पाटील यांनी सांगून टाकले.
हेही वाचा : रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या…
आज यवतमाळ येथे आयोजित जवाहरलाल दर्डा स्मृती समारोहाच्या कार्यक्रमाकरिता आले असता विखे पाटील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री सांगत असताना विनाकारण वादळ उठवणे सुरू झाले. भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राज्यात आरक्षणावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले हे योग्य नाही. नेते मंडळी काहीही बोलत असले तरी गावपातळीवर कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहतात, त्यामुळे निर्माण करण्यात येत असलेले चित्र बरोबर नाही, असे विखे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज दिली असेल तर चांगली गोष्ट आहे, अशी पुष्टीही विखे पाटील यांनी जोडली.