यवतमाळ : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा खांबावरच विजेचा धक्का लागून अक्षरशः कोळसा झाला. ही घटना नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी शेत शिवारात शुक्रवारी घडली. पंकज दुर्योधन करडे (२५, रा. खरडगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी विद्युत केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्याला मारहाण केली. नेर पोलिसांनी वीज ऑपरेटरसह तीनजणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरडगाव येथील पंकज करडे हा मागील चार वर्षांपासून विद्युत कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. शिरजगाव पांढरी शिवारात लाइनमध्ये बिघाड झाल्याने तो शुक्रवारी शिरजगाव येथील पॉवर हाउसमध्ये आला. वीजपुरवठा बंद करून रजिस्टरमध्ये नोंद केली. ऑपरेटर गजानन चक्करवार यांना सांगून वीज दुरुस्तीसाठी निघून गेला.

हेही वाचा : ठाकूर बंधूंनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले; ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात १२ कोटींचे फसवणूक प्रकरण

बिघाड असलेली लाइन दुरुस्त करण्याकरिता पंकज खांबावर चढला. त्याचा भाऊ भावेश हा देखील त्यावेळी तेथे उपस्थित होता. त्याचवेळी वीज पुरवठा सुरू झाल्याने विजेचा जबर धक्का लागून पंकजचा खांबावरच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांची गर्दी झाली. ऑपररेटर गजानन चक्करवार याला संतप्त जमावाने मारहाण केली. आपरेटर व इतर तिघांनी वीज पुरवठा सुरू केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. गजानन चक्करवार, भूषण वीर, विकी कांबळे, मुकुंद गावंडे यांना अटक झाल्याशिवाय पंकजचा मृतदेह खांबावरून उतरवून देणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब नाईक यांनी अतिरिक्त कुमक मागविली.

हेही वाचा : “आमचा जात जनगणनेला विरोध नाही”, देवेंद्र फडणवीसांचं विधान; म्हणाले, “एकाच घरातून…”

दोषींवर कारवाईचे आश्वासन देऊन पंकज करडे याचा मृतदेह खाली उतरविला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेर येथे आणण्यापूर्वी विद्युत कंपनीच्या कार्यालयात नेण्यात आला. याठिकाणी उपकार्यकारी अभियंता मनीष फरताळे यांना घेराव घालण्यात आला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऑपरेटरसह चारजणांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. यानंतर ऑपरेटर गजानन चक्करवारसह भूषण वीर, विकी कांबळे, मुकुंद गावंडे यांच्यावर भादंवि ३०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली असून, विकी कांबळे पसार झाला आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन माकोडे, बाजार समितीचे संचालक गोपाल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील खाडे, मौर्य क्रांती संघाच्या राज्य अध्यक्ष प्रमोदिनी मुंदाने, सतीश चवात आदींनी घटनास्थळी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal ner wire man dies due to electrocution when climb on electricity pole to repair it nrp 78 css
Show comments