वर्धा : प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे, असे म्हणतात. वय, जात, धर्म, उणीवा न पाहणारे ते प्रेम. त्याची अखेर विवाह बंधनात झालीच तर सोने पे सुहागा. अशीच ही कहाणी. यात दैववश आपत्तीवर मात करीत दोघे एकत्र आले आणि नेहमीसाठी एक झाले.वर्धा तालुक्यातील बरबडी येथील सत्यम प्रमोद लोहवे हा आईवडील नसलेला अनाथ. तर यवतमाळ येथील गौरी दिलीप उघडे ही दिव्यांग. दोघांची ओळख एका निमित्तमात्र कार्यक्रमात झाली. पुढे त्यातून प्रेम फुलले. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. रितिरिवाजाप्रमाणे लग्न करून उजळ माथ्याने जीवन जगण्याचा निर्णय झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुटुंबाचा विरोध आणि,,,,

मुलाला आईवडील नाही, कश्याचाच पत्ता नाही म्हणून मुलीच्या आईवडील व नातलगांनी लग्नास विरोध केला. शेवटी जोडीदार सत्यम यास विश्वासात घेऊन गौरीने वडिलांचे घर सोडले. थेट सत्यमकडे आली. या दोघांपुढे उद्भवलेला पेच पाहून गावातील गुरनुले परिवार पुढे आला. अश्या स्थितीत पेच सोडवून लग्न लावून देण्यात पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गुरनुले यांनी धाव घेतली. सत्यम व गौरीची अडचण समितीचे गजेंद्र सुरकार यांना सांगितली.त्यांनी दोघांचे समुपदेशन केले. भविष्यातील अडचणी सांगितल्या. समस्या अवगत केल्या. आईवडिलांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद होवू शकतात, याची जाणीव गौरीस करून दिली. मात्र तरीही एक दुजे के लिये, असा निर्धार ठेवणाऱ्या या दोघांनी आम्ही सज्ञान व सुजाण आहोत, म्हणून ठाम असल्याचे स्पष्ट केले. आम्हास निर्णय घेण्याचा अधिकार आहे, म्हणून रितिरिवाजाप्रमाणे लग्न करण्याची तयारी असल्याचे त्यांनी निक्षुन सांगितले. समाजात घडणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना लक्षात ठेवून सर्व ती कायदेशीर प्रक्रिया समितीने पूर्ण केली. अखेर दोघांचेही आंतरधर्मीय लग्न वैदिक पद्धतीने साधेपणात पार पडले.

हे ही वाचा…मुंबई : योजना टाळण्यासाठी भूखंडाचे तुकडे,२० टक्के सर्वसमावेश योजनेत नाशिकमधील विकासकांची शक्कल; म्हाडाकडून दखल

हे ही वाचा…Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!

हे मान्यवर वऱ्हाडी,,,,

या आगळ्यावेगळ्या सत्यशोधकी लग्न सोहळ्यासाठी वर्धा वर्धन हाटचे सभागृह संचालक गुड्डू देशमुख यांनी उपलब्ध करून दिले. या लग्नात वऱ्हाडी म्हणून विवेक वाहिनीच्या डॉ. मंजुषा देशमुख, अनिसचे प्रकाश कांबळे, सुनील ढाले, ज्योती भोसले, अनिल भोसले, बाबाराव किटे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. आशीर्वाद देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, पुस्तक दोस्तीचे प्रा. सचिन सावरकर, प्राचार्य डॉ. मोहनिश सवाई, जवान डिफेन्सचे संचालक प्रवीण पेठे, शिक्षण बचाव अभियानाचे मनोज देशमुख, मोहन खैरकार प्रामुख्याने उपस्थित होते. समितीचे राज्य सचिव गजेंद्र सुरकार यांनी सोहळ्यास मार्गदर्शन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal orphan and disabled tied the knot pmd 64 sud 02