यवतमाळ : संक्रांतीला अद्याप दीड महिना अवकाश असताना आकाशात सर्वत्र पतंगीचा खेळ सुरू झाला आहे. या पतंगीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे. आज सोमवारी शेतात जायला निघालेल्या येथील एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात रस्त्यावरील नायलॉन मांजा अडकल्याने गळा चिरला. प्रशांत रामचंद्र राऊत, रा. डेहणकर ले आऊट असे या घटनेत गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे.

प्रशांत हे नेहमीप्रमाणे आपल्या घरून शेतात जायला निघाले. शहरालगतच्या भोसा रोडवर रस्याेहवर आडवा असलेला मांजा दृष्टीस न पडल्याने त्यांच्या गळ्यात अडकला. त्यांनी हाताने मांजा दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या गळ्याला मांजामुळे गंभीर इजा झाली. मांजापासून बचाव करताना ते दुचाकीवरून पडले. गळा चिरल्याने त्यांना मोठा रक्तस्त्राव झाला. इतर वाहनचालकांनी त्यांच्या गळ्यात अडकलेला मांजा काढून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा : कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गतही पत्नीला पोटगी, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय…

स्थानिक संजीवन हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी राऊत कुटुंबियांनी अवधूतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून नायलॉन मांजा वापरणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला. सध्या प्रशांत राऊत यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीकांत राऊत यांनी दिली.

चार दिवसांपूर्वीच येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाहनात अडकलेला मांजा काढताना एका शाळकरी विद्यार्थ्याची करंगळी कापली गेली. यापूर्वी महावितरणचे एक अधिकारी, एक बँक कर्मचारी, दोन महिला नायलॉन मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाल्या. नायलॉन मांजाची विक्री करण्यास बंदी आहे. तरीही शहरात अनेक विक्रेते छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री करतात. चिनी नायलॉन मांजा अधिक घातक आहे. नायलॉन मांजाची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने माजांची खुलेआम विक्री होत असल्याची ओरड आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयच म्हणाले, प्रकरण निकाली काढण्यासाठी न्यायालयांना वेळेचे बंधन नकोच..

पतंग उडविणाऱ्यांनाही दंड आवश्यक

नायलॉन मांजा विक्रेत्यांसोबतच हा मांजा वापरणाऱ्यांविरोधातही कारवाई व्हायला हवी, असा सूर उमटत आहे. चिनी नायलॉन मांजा स्वस्त असल्याने तो विकत घेवून पतंग उडविण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, पंतग उडविण्याच्या नादात हा मांजा कोणाच्या जीवावर बेतू शकतो, याची जाणीव पतंग उडविणाऱ्या नसते. त्यामुळे रस्त्यालगत पतंग उडविणाऱ्यांनी खबरदारी घेण्यासोबतच, पतंगीसाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधातही कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.

Story img Loader