यवतमाळ : व्यसनांनी कुटुंबाची वाताहत होते. तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. त्यामुळे तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करून सशक्त युवापिढी घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यात ‘नशामुक्त पहाट’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात चित्रफितीसह पथनाट्यातून जनजागृती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेंदूला बधीर करणार्‍या मादक पदार्थाच्या अतिरेकी सेवनात युवापिढी अडकली आहे. या व्यक्ती स्वत:च्या हातानेच घात करून घेत आहे. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनातून सुटका होऊ शकते. ही इच्छाशक्ती तयार करण्यासाठी योग्य प्रयत्नांची जोड व मार्गदर्शन मिळणेही आवश्यक आहे. ‘सशक्त यवतमाळचा एकच नारा, व्यसनाला देऊ नका थारा’ अशी हाक या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हेही वाचा : “गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व्यसनमुक्तीसाठी व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. आज मंगळवारपासून २० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते १२.३० व दुपारी दीड ते ३ अशा दोन टप्प्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगण येथील वक्त्यासंह पोलीस अधिकारी व इतर विभागातील अधिकारी येणार असून, चित्रफिती व दृकश्राव्याद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे अभियान एक चळवळ व्हावे, यासाठी ‘ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर’ संकल्पनेनुसार पालकवर्ग, शिक्षक, पोलीस पाटील यांनाही मार्गदर्शन करून सहभागी करून घेण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्यातून जनजागृती करणार आहेत.

हेही वाचा : बुलढाणा : काय सांगू भाऊ, मजुरीचे दर वाढले, पण मजूरच मिळेना! हजारो सोयाबीन उत्पादकांची दैना

‘अवेअरनेस ऑन रिल्स’

व्यसनाच्या विळख्यात सर्वाधिक युवापिढी अडकत आहे. युवापिढीला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी ‘अवेअरनेस ऑन रिल्स’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले केले. एकपात्री अथवा बहुपात्री गृपद्वारे ४५ सेकंदाची व्यसनमुक्तबाबत रिल्स तयार करून ती पोलीस दलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २८ ऑक्टोबरपर्यंत टॅग करावी लागणार आहे. उत्कृष्ट १० रिल्सला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal police organized nashamukt pahat program for youths to keep them away from addictions nrp 78 css
Show comments