यवतमाळ : सध्या महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. कोणाचा पायपोस कोणात नाही. कोण कोणत्या पक्षात आहे, हेही कळेनासे झाले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व मतदारसंघात उमेदवार उतरवणार आहे. या उमेदवारांच्या चाचणीसाठी हा दौरा असून राज्यातील जनतेने राज ठाकरेंच्या हातात एकदा सत्ता देऊन बघावी. कायदा काय असतो, हे सर्वांना दाखवून देईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे आज शुक्रवारी येथील शिवाजी चौकात आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मनसे युवासेना प्रमुख अमित ठाकरे, राजू उंबरकर, अनिल हमदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. राज्यात घडत असलेल्या बाललैंगिक अत्याचारासह महिला अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. लोकांना कुठल्याच गोष्टीचा राग येत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नाही. मनसेच्या हातात एकदा सत्ता द्या. कायदा काय असतो ते दाखवून देण्यासोबतच कोणाचीही येथील महिला, मुलींकडे नजर वर उचलून बघण्याची हिंमत होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. अनेकदा घटना घडल्यानंतर पोलिसांना दोष दिला जातो. मात्र मी त्यांना जबाबदार धरत नाही. पोलिसांच्या हाती काहीही नाही. पोलिसांना कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य द्या, ४८ तासात अख्खा महाराष्ट्र साफ करून ठेवतील, असे ठाकरे म्हणाले. आजघडीला राज्यात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्या, बियाण्यांचा प्रश्न आहे. सरकार वेळ मारून नेत असल्याने आत्महत्या काही थांबत नाही. या सर्व गोष्टींना मनसेची सत्ता हेच उत्तर आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील, मनसेच्या वतीने उमेदवारांची चाचपणी करून त्यांची नावे घोषित करण्यात येत आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून राजु उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणाही त्यांनी केली. पुन्हा प्रचारासाठी येऊ असे सांगत येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत बसलेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे हे मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार होते. मात्र वेळेअभावी ही बैठक न घेता त्यांनी सभा घेत संबोधित केले. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा : गोंदियात थरार… तरुणाची धारदार शस्त्राने हत्या…
अमित ठाकरे मैदानात
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीसाठी ते गुरूवारी रात्री वणी येथे मुक्कामी पोहचले.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीसाठी ते गुरूवारी रात्री वणी येथे मुक्कामी पोहोचले. हॉटेललगत असलेल्या स्पोर्ट्स क्लबवर जाऊन अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह क्रिकेट, फुटबॉल खेळाचा आनंद लुटला. pic.twitter.com/dtCep92GTE
— LoksattaLive (@LoksattaLive) August 23, 2024
यावेळी हॉटेललगत असलेल्या स्पोर्ट्स क्लबवर जावून अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह क्रिकेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद लुटला. अमित ठाकरे थेट मैदानात उतरल्याने मनसे युवा सैनिकातही चांगलाच जोश संचारला होता.