यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणींनी एका तरुणास बेदम मारले. सोबतच रस्त्यावरील नागरिकांना शिवीगाळ केली. कळंब येथील रहदारीच्या बसस्थानक चौकात घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ सार्वत्रिक झाला असून विविध चर्चा सुरू आहेत. नशेच्या आहारी गेल्याने अनेकजण संकटांना आमंत्रण देतात. अनेक मद्यपी भान विसरून रस्त्यातच गोंधळ घालतात. असाच प्रकार कळंब येथील बसस्थानक परिसरात घडला. तीन मद्यधुंद युवतींनी प्रचंड राडा केला.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरुणींनी हमरस्त्यावर धिंगाणा घालत एका तरुणाला बेदम मारहाण केली. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. याचवेळी त्या तरुणी येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत होत्या. यावेळी तरुणींनी दोघांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ एकाने शूट केला. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच पसरला आहे.

three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
Institution director arrested in case of abusing school children Pune print news
शाळकरी मुलांवर अत्याचार प्रकरणात संस्थाचालक अटकेत
Burning of Amit Shahs symbolic effigy in akola
अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
pune crime news
पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड
pune police pistols marathi news
पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत, सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात कारवाई

हेही वाचा : सायबर गुन्हेगार खेळतायेत जनधन योजनेचे ‘स्क्रॅच क्रार्ड’, ५ हजार रुपये खात्यात टाकण्याचे आमिष

नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस बरेच उशिरा आले. त्यातही महिला पोलीस नसल्याने या तरुणींना आवरायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी त्या तीन तरुणींना ताब्यात घेत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या नशेत असल्याने कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यानंतर पोलिसी भाषेत त्यांना समज देण्यात आली.

हेही वाचा : ‘गण गण गणात बोते’, शेगाव नगरीत लाखांवर भाविकांची मांदियाळी!

मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी तिन्ही तरुणींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सतत भाविकांची वर्दळ असलेल्या चिंतामणी नगरीत घडलेल्या या घटनेने कळंब शहरात विविध चर्चा सुरू असून पोलिसांनी बसस्थानक व चिंतामणी मंदिर परिसरात पोलिसांची कायमस्वरूपी ड्युटी लावण्याची मागणी पुढे आली आहे.

Story img Loader