लोकसत्ता टीम
यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काही तासांवर येवून ठेपली आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांकडे असलेले निवडणूक चिन्हसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळी निवडणूक चिन्हामुळे महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पूर्वी निवडणुकीत पक्षाचे चिन्ह हाच प्रचाराचा मुख्य आधार होता. चिन्ह हेच उमेदवाराची ओळख असायचे. काँग्रेसच्या राजवटीत तर ‘पंजा’ या चिन्हावर ग्रामीण भागात डोळे लावून शिक्के मारले जायचे, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. आता निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत बदल झाला आहे. मतपत्रिकेऐवजी इव्हीएमवर मतदान केले जाते. गेल्या तीन लोकसभा निवडणुका या इव्हीएमवर लढल्या गेल्या. यामुळे निवडणुकपूर्व व निवडणुकपश्चात प्रक्रिया सोपी झाली. यंत्रणेवरील ताण कमी झाला. यावेळी होत असलेली लोकसभा निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी आहे. पूर्वी एकच असलेले पक्ष आता एकमेकांचे विरोधक म्हणून आमन-सामने आले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी एक उमेदवार शिवसेना उबाठा गटाचा तर दुसरा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा असल्याने, शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. यात महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांना ‘धुनष्यबाण’ हे चिन्ह मिळाले आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे.
आणखी वाचा-गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण अबालवृद्धांना माहिती आहे. शिवसेना म्हटले की, नजरेसमोर धनुष्यबाण येतो. तर धनुष्यबाण म्हटले की शिवसेना आठवते, असे समीकरण झाले असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमच धनुष्यबाणाशिवाय हाती मशाल घेवून निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेचे मूळ नाव व पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे असल्याने या चिन्हाचा फायदा महायुतीला सर्वत्रच होणार आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठाच्या उमेदवाराचे धनुष्यबाण चिन्ह नसल्याने नुकसान होण्याची शक्यता वर्तवल जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक आजही चिन्ह पाहून मतदान करतात. अनेक मतदारांना उमेदवाराचे नाव, पक्ष काहीच माहिती नसते. त्यांना केवळ आपल्याला अमूक चिन्हासमोरचे बटण दाबायचे आहे, एवढीच कल्पना असते. शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे मेंदूत फिट आहे. शिवाय इव्हीएमवर राजश्री पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकार आहे. अनेकजण मतदानाला गेल्यावर काहीही विचार न करता पहिले बटन दाबून देतात. या सर्व गोष्टींचा फायदा यावेळी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
शिवसेना उबाठाची मशाल चिन्हावर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. मात्र मशाल हे चिन्ह अद्यापही ग्रामीण भागात घरोघरी पोहोचले नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे चिन्ह असलेल्या उमदेवारास यामुळे किमान १० टक्के अधिक मते मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे यावेळी मतपेटीत धुनष्यबाण खळबळ उडवणार की मशाल पेटणार, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.