यवतमाळ : जिल्ह्यातील नेर येथील महिला मुलासह तिरूपती बालाजी येथे दर्शनासाठी गेली. तेथे रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे घडली. शारदा गणेश गावंडे (४५, रा. तंबाखेनगर, नेर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलासह तिरूपती बालाजी येथे आठ दिवसांपूर्वी दर्शनासाठी गेल्या होत्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : यवतमाळ : परजिल्ह्यातून चोरल्या १० लाखांच्या दुचाकी
दरम्यान, विजयवाडा येथे त्या रेल्वेमध्ये चढताना खाली कोसळल्या. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
First published on: 12-07-2024 at 14:11 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal woman from ner village died in accident at tirupati nrp 78 css