यवतमाळ : पुसद तालुक्यातील पांढुर्णा बु. केदारलिंग येथे पैनगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेला तरुण बुडल्यानंतर बेपत्ता झाला होता. या तरुणाचा मृतदेह २२ तासानंतर आज, मंगळवारी सापडला. सुमित शिवाजी आठवले (३५, रा.कानेडखेड) असे मृताचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुमित पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला.

हेही वाचा : नोकरी सांभाळून ‘ते’ देतात पोलिस, सैन्य भरतीचे मोफत धडे; एकाच प्रयत्नात १४ अग्निवीर, २५ जण पोलीस दलात

मात्र तो पात्रातून बाहेर आलाच नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु त्याचा कुठेही शोध लागला नाही. आज यवतमाळ येथील एनडीआरएफ पथकाने नदीपात्रात शोधकार्य सुरु केले. सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader