प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे लोकार्पण युवा दिनी म्हणजे १२ जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, हा सोहळा वर्धा की कळंब स्थानकावर घ्यायचा याचा वाद उद्भवल्याने रद्द करण्यात आला आहे.खासदार रामदास तडस हे सोहळा वध्र्यात घेण्याबाबत आग्रही होते. तर श्रेय घेण्यास उत्सुक काही यवतमाळकर नेते कळंबसाठी हट्ट धरून बसले होते. या वादात शेवटी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय नागपूर विभागीय रेल्वे प्रशासनाने घेतला. तडस हे अन्य राज्यात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र, त्यांच्या कार्यालयाने सोहळा रद्द झाल्याचे मान्य केले.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट

थेट पंतप्रधान कार्यालयाने या रेल्वेमार्गाबाबत माहिती घेतली होती.  उद्घाटनाला खासदारासह वर्धा व देवळी येथील तसेच यवतमाळचे आमदार उपस्थित राहू शकतात का, अशी चौकशी करण्यात आली. मात्र, रेल्वे प्रशासन हा औपचारिक कार्यक्रम कळंब रेल्वे स्थानकावर तर खासदार वर्धा स्थानकावर  घेण्याबाबत आग्रही राहिले.  या मार्गाबाबत तडस यांनी सतत पाठपुरावा केला होता.  म्हणून वध्र्यात सोहळा व्हावा, अशी भूमिका त्यांनी घेतली.  वाद न निवळल्याने अखेर उद्घाटन रद्द करण्यात आले.   या मार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असून गाडय़ा डिसेंबर अखेरीस धावायला सुरुवात होईल, अशी शक्यता नागपूर विभागीय रेल्वेचे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव यांनी चार महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.

हेही वाचा >>>नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल, काही पदावर होणार आता अशी निवड

१५ मोठे पूल, २९ बोगदे

’  वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे.

’ वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून देवळी रेल्वेस्थानक तयार झाले आहे. २००९ मध्ये मंजूर झालेल्या या मार्गाच्या कामास २०१६ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात झाली.

’ सध्या वर्धा येथून नांदेडला जाण्यास दहा तास लागतात. पण हा मार्ग सुरू झाल्यानंतर केवळ चार तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

’ एकूण २०६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे.