वर्धा : बहुप्रतिक्षित, बहुचर्चित वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे लोकार्पण युवा दिनी म्हणजे १२ जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्ही.सी. द्वारे मार्ग खुला झाल्याचे जाहीर करणार आहे. थेट पंतप्रधान कार्यालयातून याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला याविषयी विचारणा झाली आहे. खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयाने यास दुजोरा दिला आहे.

या दिवशी खासदार तसेच वर्धा व देवळी येथील तसेच यवतमाळचे आमदार उपस्थित राहू शकतात का, अशी चौकशी झाली. मात्र रेल्वे प्रशासन या दिवशी औपचारिक कार्यक्रम कळंब रेल्वे स्थानकावर तर खासदार वर्धा स्थानकावर कार्यक्रम घेण्याबाबत आग्रही आहे. हा वादाचा मुद्दा आहे. या मार्गाबाबत तडस यांनी सतत पाठपुरावा केला. प्रश्न मार्गी लावला. म्हणून वर्ध्यात सोहळा व्हावा, अशी भूमिका आहे.

shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश

हेही वाचा – सरपणासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू; चंद्रपूरच्या कारवा वनक्षेत्रातील घटना

वाद निवळेल, अशी शक्यता आहे. या मार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असून गाड्या डिसेंबर अखेरीस धावायला सुरवात होईल, अशी शक्यता नागपूर विभागीय रेल्वेचे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव यांनी चार महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. एकूण २०६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून देवळी रेल्वेस्थानक वास्तू तयार झाली आहे. २००९ मध्ये मंजूर झालेल्या या मार्गाच्या कामास २०१६ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात झाली.

हेही वाचा – नागपुरात ३१ फुटांचे ‘श्री राम’..  हलबा समाज शिल्पकार संघद्वारे अयोध्येतील मंदिर सोहळ्यादरम्यान नियोजन

सध्या वर्धा येथून नांदेडला जाण्यास दहा तास लागतात. पण हा मार्ग सुरू झाल्यानंतर केवळ चार तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ व मराठवाड्यास जोडणारा हा मार्ग विकासाचे नवे पर्व सुरू करणार, असा विश्वास तडस यांनी पाहणीवेळी व्यक्त केला होता. लोकार्पण १२ जानेवारीला कुठे होणार हाच उत्सुकतेचा प्रश्न आहे.