यवतमाळ : मजुरी करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री वणी तालुक्यातील नवरगाव शेतशिवारात घडली. वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९, रा. टागोर चौक), कपिल व्यंकटेश अंबलवार (३५, रा. जैताईनगर), मनोज अजाबराव गाडगे (४७, रा. रामपुरा वार्ड), वैभव घनश्याम गेडाम (२२, रा. लालगुडा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. महिला आपल्या मुलासह राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असून मोलमजुरीचे काम करते. एका आरोपीचे पीडित महिलेच्या मुलाकडे पैसे होते. पैसे मागण्यासाठी चौघे दुचाकीने राजूरला पोहचले. पीडितेला तिच्या मुलाबाबत विचारणा केली, तो घरी नसल्याचे सांगताच त्याला शोधायला चल म्हणत ऑटोने वणीत आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यानंतर एक कार भाड्याने घेत महिलेला बसवले. वाटेतच एका बारमध्ये चौघांनी मद्यपान केले. थोडीशी दारू पाण्याच्या बाटलीत आणून पीडितेला पाजण्याचा प्रयत्न केला. वाहन मारेगावच्या दिशेने धावत असताना वाहन नवरगावकडे वळवले. त्या परिसरातील एका शेतात नेऊन चौघांनीही महिलेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचार केल्यावर पीडितेला रात्रीच राजूर येथे सोडून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने वणी पोलीस ठाणे गाठून घडलेली आपबिती कथन केली. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.