नागपूर : गजबजलेल्या परिसरात आणि बाजारात येणाऱ्यांचे मोबाईल चोरी करायचे आणि म्होरक्याला नेऊन द्यायचे, असा प्रकार काही लहान मुले करीत होते. लहान मुलांनी चोरलेल्या मोबाईलची स्वस्तात विक्री करून पैसे कमविण्याचा धंदा एकाने सुरु केला होता. मात्र, तो सदर पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून ३३ मोबाईल फोन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. शेख रियाज शेख मुजाहिद (२३) रा. मोतिझरना, साहेबगंज, झारखंड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गत काही दिवसांपासून मंगळवारी बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. मंगळवारी बाजार असल्याने पोलीस परिसरात सक्रीय होते. या दरम्यान पोलिसांना रियाज संशयास्पदरित्या मोटारसायकलने जाताना दिसला. त्याच्याजवळ एक लाल रंगाची बॅग होती. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. पाठलाग करून गोवा कॉलनीजवळ त्याला पकडण्यात आले. बॅगच्या झडतीत विविध कंपन्यांचे ३३ मोबाईल फोन मिळाले. मोबाईल आणि त्याच्याजवळ मिळालेल्या मोटारसायकल क्र. एमएच-३१/सीडी-६२९५ चे कागदपत्र मागितले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. ठाण्यात आणून रेकॉर्ड काढला असता मोटारसायकल बैरामजी टाऊन परिसरातून चोरी झाल्याचे समजले.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा – चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…

भाड्याच्या खोलीत मुलांची व्यवस्था

रियाजने यशोधरानगरच्या गुलशननगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. तेथे त्याच्यासोबत काही मुलेही राहात होती. पोलिसांनी खोलीवर धाड टाकली, मात्र एकही मुलगा मिळाला नाही. पोलिसांना संशय आहे की, रियाजसोबत इतर आरोपीही परिसरात सक्रीय होते. तो सापडल्याची माहिती मिळताच सर्व भूमिगत झाले. चौकशीत रियाजने सांगितले की, तो झारखंड येथून मुलांची टोळी घेऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो. आठवडी बाजारात मुले लोकांना घेरून धक्काबुक्की करतात आणि मोबाईल लंपास करून पसार होतात. एका शहरातून ७० ते ८० मोबाईल गोळा झाल्यानंतर आरोपी परत झारखंडला फरार होत होतो.

हेही वाचा – अकोला : बारावीच्या परीक्षेत बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला तोतया पोलीस, असे फुटले बिंग…

बाजारात मुलांवर ठेवत होता नजर

बाजारात रियाज मुलांवर नजर ठेवत होता. एखादा मुलगा सापडल्यास तो पालक बनून तेथे पोहोचत होता. माफी मागून चोरी करणाऱ्या मुलाला सोडवत होता. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा खुलासा होऊ शकतो. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कुणाल धुरट, मिलिंद भगत, सय्यद हबीब यांनी केली.