नागपूर : नागपुरातील प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय क्षेत्रात गेल्या पाच वर्षांमध्ये आयकरातून मिळणारा महसूल अडीच पटींनी वाढला आहे. २०१८- १९ पासून २०२२-२३ पर्यंत करोनाचे एक वर्ष (२०२०- २१) सोडले तर इतर वर्षात सातत्याने महसूलात वाढ नोंदवली जात आहे.नागपुरातील प्रधान मुख्य कायकर आयुक्त कार्यालय क्षेत्रात २०१८- १९ मध्ये ४ हजार १५८.५ कोटी, २०१९- २० मध्ये ५ हजार ४७०.७ कोटी रुपये, २०२०- २१ मध्ये ५ हजार १४१.७ कोटी रुपये, २०२१- २२ मध्ये ८ हजार ५००.८ कोटी रुपये, २०२२- २३ मध्ये १० हजार ४२६.३ कोटी रुपये आयकरपोटी महसूल प्राप्त झाल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारातून पुढे आणले.

या कार्यालयात २०१८- १९ मध्ये १२ लाख ३३ हजार २४ आयकर दाते होते. ही संख्या २०१९- २० मध्ये १३ लाख ८० हजार ६१, २०२०- २१ मध्ये १४ लाख १३ हजार २२३, २०२१- २२ मध्ये १४ लाख ८९ हजार ३५, २०२२- २३ मध्ये १५ लाख ५६ हजार ९६० आयकरदात्यांवर गेली. तर कार्यालयाने प्रयत्न केल्याने थकलेल्या आकरकरपोटी २०१८- १९ मध्ये ८९.९६ कोटी, २०१९- २० मध्ये ६७.२० कोटी, २०२०- २१ मध्ये ८४.९७ कोटी, २०२१- २२ मध्ये ८१.०५ कोटी, २०२२- २३ मध्ये २०८.८४ कोटी रुपये वसूल केल्याचेही कोलारकर यांनी पुढे आणले.

हेही वाचा >>>शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…

रिक्त जागेचा तपशील

नागपुरातील प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात आयकर अधिकाऱ्यांची ९२ मंजूर पदांपैकी ३ रिक्त आहेत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे. प्रशासकीय अधिकारी (जीआर २) गटातील ८ मंजूर पदांपैकी २ रिक्त आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याचे (जीआर ३) गटातील १७ पदांपैकी ६ रिक्त आहे. वरिष्ठ खासगी सचिवाच्या सात मंजूर पदांपैकी ३ रिक्त आहे. इनस्पेक्टरचे २१९ मंजूर पदांपैकी २५ रिक्त आहे. ऑफिस सुप्रिटेंडेंटच्या ७४ पदांपैकी ५६ रिक्त आहेत. वरिष्ठ टॅक्स असिस्टंटच्या २०४ पदांपैकी १०८ रिक्त आहेत. टॅक्स असिस्टंटच्या २१५ पदांपैकी ७१ रिक्त आहेत. इतरही काही पदे रिक्त असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

Story img Loader