नागपूर टीम
नागपूर : केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरमध्ये सर्वात मोठे अत्याधुनिक कविवर्य सुरेश भट सभागृह बांधण्यात आले. तेथे शनिवारी व्यापारी संमेलन गडकरीनी घेतले. या संमेलनाला आलेल्या व्यापाऱ्यांची झालेली गैरसोय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
संमेलनात उपस्थित व्यावसायिकांना गडकरी यांनी प्रोत्साहन दिले. रोजगार देणारे आपण आहात हे सांगत त्यांनी चुकीच्या मार्गाने व्यापार करणाऱ्यांचे कानही टोचले. पण या निमित्ताने सभागृहातील व्यवस्थेचा अभाव उघड झाला. भव्यदिव्य स्वरूप असलेल्या सुरेश भट सागृहातील स्वच्छता गृहातील सर्वच नळ निकामी आहेत. ते दुरूस्त करण्याऐवजी व्यस्थापाने ते निकामी असल्याचे फलक लावले. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता गृहाची सुविधा महत्वाची असते. संबधितांनी याकडे लक्ष द्यावे, असे या कार्यक्रमात सहभागी व्यावसायिक व श्रीगुरूदेव युवामंच प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी म्हटले आहे.