नागपूर : प्रकल्प आणि उद्योगांसाठी वनजमिनी मोठय़ा प्रमाणावर दिल्या जात असतानाच आता वणव्यामुळे देखील जंगल नाहीसे होत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात यावर्षी सुमारे २४ हजार ५९२ वणव्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोरडी पाने, डहाळय़ा आदी ज्वलनशील पदार्थाच्या संचयासह मानवी कृतीमुळे जंगलाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

 एकीकडे वणव्यांचा काळ, मोह फुले वेचण्याचा हंगाम आणि तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतात. मोह फूल वेचण्याच्या काळात आणि तेंदूपत्ता संकलनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात आगीच्या घटना घडतात. हे वनोपज मोठय़ा संख्येने मिळवण्यासाठी देखील बरेचदा ते वेचणारे आग लावतात.  गावातील गुराखीसुद्धा गुरांसाठी चारा जास्त उगवेल या गैरसमजूतीतून गवताला आग लावतात. यामुळे जंगलात आगी पसरतात. शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात आग लावतात. यामुळेही शेताजवळील जंगलात आग लागते. मधल्या काही वर्षांत वनव्यांची संख्या कमी झाली. परंतु, आता पुन्हा त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ओडिशा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये यात आघाडीवर आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पारंपरिक पद्धतीने विझवले जाणारे वणवे नियंत्रणात आणण्यासाठी आता ह्णफायर ब्लोअरह्णह्ण सारखी नवी साधने आली आहेत. तरीही वणवा नियंत्रणात आणणे कठीण होत चालले आहे. राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वणवे लागत आहेत. साधारणत: पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरपासून जूनपर्यंत देशभरात जंगलामध्ये वणव्याच्या घटना घडतात. महाराष्ट्रात कोरडी पानझडी जंगले आहेत. साधारणत: जानेवारी पासून राज्यात पानगळतीला सुरवात होते. जेव्हा राज्यात वनवणव्यांचा काळ येतो तेव्हा जंगलांमध्ये मोठय़ा प्रमाणात बायोमास जमा झालेला असतो. जंगलाला लागणाऱ्या आगीचे हे देखील एक मोठे कारण आहे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
Pomegranate loksatta news
फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री
Vasai Municipal corporation action against unauthorized construction begins
अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू
Salt water agriculture Uran , farmers Uran,
खाऱ्या पाण्यामुळे शेती नापिकीच्या मार्गावर, उरणमधील दोन हजार हेक्टर जमीन समुद्राच्या भरतीमुळे धोक्यात ?
Opposition protests in Legislative Assembly area on issue of getting guaranteed price for farmers
कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…
Maharashtra accounts for 95 percent of the country grape production but why do farmers still destroy vineyards
देशातील ९५ टक्के द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात…तरीही शेतकरी द्राक्षबागांवर कुऱ्हाड का चालवत आहेत?

राज्य वन अहवाल काय सांगतो?

देशातील सुमारे ३५.४६ टक्के वनक्षेत्रात वारंवार आगी लागत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात चार टक्के वनक्षेत्रात आग लागण्याची भीती तर सहा टक्के वनक्षेत्रात भीषण आग लागण्याची भीती राज्य वन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

वणवे मानवनिर्मित?

२२ मे रोजी नागपूरच्या गोरेवाडा जंगलाला आग लागली. यात थोडेथोडके नाही तर तब्बल १५० हेक्टर जंगल जळाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या निलगिरी लाकडाच्या वखारीत ३० हजार टन लाकडाची  राख झाली. ही आग जंगलातील वणव्यामुळे लागली की या आगीमुळे जंगलाला आग लागली, याची चौकशी सध्या सुरू आहे.

Story img Loader