नागपूर : प्रकल्प आणि उद्योगांसाठी वनजमिनी मोठय़ा प्रमाणावर दिल्या जात असतानाच आता वणव्यामुळे देखील जंगल नाहीसे होत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात यावर्षी सुमारे २४ हजार ५९२ वणव्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोरडी पाने, डहाळय़ा आदी ज्वलनशील पदार्थाच्या संचयासह मानवी कृतीमुळे जंगलाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकीकडे वणव्यांचा काळ, मोह फुले वेचण्याचा हंगाम आणि तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतात. मोह फूल वेचण्याच्या काळात आणि तेंदूपत्ता संकलनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात आगीच्या घटना घडतात. हे वनोपज मोठय़ा संख्येने मिळवण्यासाठी देखील बरेचदा ते वेचणारे आग लावतात. गावातील गुराखीसुद्धा गुरांसाठी चारा जास्त उगवेल या गैरसमजूतीतून गवताला आग लावतात. यामुळे जंगलात आगी पसरतात. शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात आग लावतात. यामुळेही शेताजवळील जंगलात आग लागते. मधल्या काही वर्षांत वनव्यांची संख्या कमी झाली. परंतु, आता पुन्हा त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ओडिशा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये यात आघाडीवर आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पारंपरिक पद्धतीने विझवले जाणारे वणवे नियंत्रणात आणण्यासाठी आता ह्णफायर ब्लोअरह्णह्ण सारखी नवी साधने आली आहेत. तरीही वणवा नियंत्रणात आणणे कठीण होत चालले आहे. राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वणवे लागत आहेत. साधारणत: पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरपासून जूनपर्यंत देशभरात जंगलामध्ये वणव्याच्या घटना घडतात. महाराष्ट्रात कोरडी पानझडी जंगले आहेत. साधारणत: जानेवारी पासून राज्यात पानगळतीला सुरवात होते. जेव्हा राज्यात वनवणव्यांचा काळ येतो तेव्हा जंगलांमध्ये मोठय़ा प्रमाणात बायोमास जमा झालेला असतो. जंगलाला लागणाऱ्या आगीचे हे देखील एक मोठे कारण आहे.
राज्य वन अहवाल काय सांगतो?
देशातील सुमारे ३५.४६ टक्के वनक्षेत्रात वारंवार आगी लागत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात चार टक्के वनक्षेत्रात आग लागण्याची भीती तर सहा टक्के वनक्षेत्रात भीषण आग लागण्याची भीती राज्य वन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
वणवे मानवनिर्मित?
२२ मे रोजी नागपूरच्या गोरेवाडा जंगलाला आग लागली. यात थोडेथोडके नाही तर तब्बल १५० हेक्टर जंगल जळाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या निलगिरी लाकडाच्या वखारीत ३० हजार टन लाकडाची राख झाली. ही आग जंगलातील वणव्यामुळे लागली की या आगीमुळे जंगलाला आग लागली, याची चौकशी सध्या सुरू आहे.