लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय दळनवळनमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात मागील सात वर्षांची तुलना केल्यास यंदा अपघाताच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण खूपच वाढल्याची धक्कादायक माहिती आहे. २०२४ मध्ये सहा महिन्यातच नागपूर शहर हद्दीत अपघाती मृत्यूचे शतक नोंदवले गेले असून प्रत्येक १०० अपघातामागे ३२ जण दगावल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Sharad Pawar Hinganghat, Sharad Pawar news,
मतदान झाल्याबरोबर सरकारी योजनांचा खरा चेहरा…. शरद पवारांनी सांगितले भविष्यात काय घडणार?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या नागपूर शहरात २०१८ मध्ये ३६८ अपघातात ७० नागरिकांचा मृत्यू झाला तर ३६४ जण जखमी झाले. शहरातील अपघाताच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १९.०२ टक्के होते. २०१९ मध्ये ४४० अपघातात ११४ मृत्यू झाले व ४४४ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५.९० टक्के होते. २०२० मध्ये ३१८ अपघातामध्ये ८१ मृत्यू तर २९७ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५.४७ टक्के होते. २०२१ मध्ये ३९४ अपघातात ११८ मृत्यू झाले, ३६२ जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २९.९४ टक्के होते.

आणखी वाचा-बच्चू कडूंच्या मोर्चासाठी महिलांची दिशाभूल; सहलीसाठी नेत असल्याचे…

वर्ष २०२२ मध्ये ५२७ अपघातात १४५ मृत्यू तर ५३३ जण जखमी झाले. या वर्षात मृत्यूचे प्रमाण २७.५१ टक्के होते. २०२३ मध्ये ६०४ अपघातात १५१ मृत्यू तर ५९७ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५ टक्के होते. यंदा १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यात ३३७ अपघातात ११० जणांचा मृत्यू झाला, तर २९३ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२.६४ टक्के नोंदवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांच्या अर्जावर पोलीस निरीक्षक अपघात शाखेचे सतीश फरकाळे यांनी ही माहिती दिली. शहरात यंदा प्रत्येक १०० अपघातामागे ३२ जणांचा मृत्यू होत झाल्याने अपघातावर नियंत्रणासाठी नागपूर शहर पोलिसांसह जिल्हा रस्ता सुरक्षा समिती काय उपाय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आणखी वाचा-राष्ट्रवादी नेता पुत्राचे ट्वीट, ‘धन्यवाद, सुधीरभाऊ…’

गंभीर जखमींची संख्या जास्त

नागपूर शहरात १ जानेवारी ते ३० जून २०२४ दरम्यान सहा महिन्यात १०९ अपघात झाले. त्यात ११० जणांचा मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले. गंभीर संवर्गातील १५१ अपघातात १८४ जण गंभीर जखमी झाले. गैरगंभीर संवर्गातील ७७ अपघातात ९० जण किरकोळ जखमी झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

दगावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पुरूष

नागपूर शहरात १ जानेवारी ते ३० जून २०२४ दरम्यान सहा महिन्यात अपघातानंतर दगावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पुरूषांचा समावेश आहे. शहरात १०९ अपघातात ११० मृत्यू झाले. त्यात ९६ पुरूष तर १४ महिलांचा समावेश आहे.