नागपूर : हिरव्यागार शहरांच्या यादीत कधीकाळी अग्रक्रमावर असलेली उपराजधानी आता वायू प्रदूषणातही समोर दिसत आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता शहरातील चारही केंद्रांवरील नोंदीनुसार पुन्हा वायू प्रदूषणाची भयावह आकडेवारीसमोर आली आहे. सर्वाधिक हिरवळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्समधील केंद्रावर हवा गुणवत्ता निर्देशांक २४१ इतका नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापूर्वी शहरातील एकाच केंद्रातून प्रदूषणाचा डाटा पाठवला जात होता. मात्र, आता शहरातील चारही केंद्रावरून डाटा जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जीपीओ कार्यालय सिव्हील लाईन्स, रामनगर आणि महाल या चार ठिकाणी ही केंद्र आहेत. या चारपैकी महाल येथील केंद्रावर २०९ तर जीपीओ सिव्हील लाईन्स केंद्रावर २४१ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. रामनगर येथील केंद्रावर १६७ आणि अंबाझरी केंद्रावर तो १६० इतका नोंदवण्यात आला. या चारही केंद्रांवर अतिसुक्ष्म धुलीकण म्हणजेच पीएम २.५ व पीएम १० चे प्रमाण अधिक आहे. हे सर्व केंद्र शहराच्या आत असतानाही प्रदूषणाची पातळी अधिक आहे. त्यामुळे कोराडी व खापरखेडा या औष्णिक वीज केंद्राजवळ तसेच शहरातील भांडेवाडीजवळ प्रदूषणाची मोजणी करणारे केंद्र उभारल्यास शहरात प्रत्यक्षात असलेल्या वायू प्रदूषणाची नोंद होऊ शकते. जेथे कारखाना नाही, वाहनांची वर्दळ नाही, बांधकाम नाही अशा ठिकाणी प्रदूषण उच्च पातळीवर आहे. त्यामुळे दिवाळीत ते आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात वाढला मतदानाचा टक्का; महिलांचा उत्साह

हेही वाचा – “मी शुद्र असल्यामुळेच सुप्रिया सुळेंकडून लक्ष्य केले जाते”, सुनील तटकरे असे का म्हणाले….

विकासकामांची किंमत मोजावी लागतेय

शहराच्या वायू प्रदूषणासाठी अतिसुक्ष्म धुलीकण म्हणजेच पीएम २.५ कारणीभूत ठरत आहे. हिरवळीच्या ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक २४१ असणे म्हणजेच नागपूर शहर प्रदूषणाच्या बाबतीत अतिशय धोकादायक स्थितीत आहे. शहरात वेगाने होणाऱ्या विकासाची किंमत नागपूरकरांना प्रदूषणाच्या रुपात मोजावी लागत आहे. – सुरभी जैस्वाल, समूह प्रमुख, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in air pollution in nagpur the amount of pm 25 increased rgc 76 ssb
Show comments