नागपूर : दिवाळीनिमित्त राज्यभरात झालेल्या रोषणाईमुळे दोन दिवसांपासून विजेची मागणी १२५ मेगावाॅटने वाढली आहे. परंतु राज्यातील काही भागात पाऊस पडत असल्याने कृषी पंपाचा वापर कमी झाला आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी स्थिर आहे.

हेही वाचा – २८३ शिक्षकांच्या आयुष्यात यावर्षी दिवाळी लखलखली

हेही वाचा – महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १८१ आजार वगळणार, हे आहे कारण..

दिवाळीनिमित्त राज्यभरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे विजेचा वापर सुमारे १२५ मेगावाॅटने वाढला आहे. परंतु दुसरीकडे राज्यातील काही भागांत पाऊस पडल्याने कृषी पंपाचा वापर कमी झाला आहे. सुट्यांमुळे काही उद्योग, कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळेहीे विजेचा वापर कमी झाला आहे. महानिर्मितीसह विविध खासगी वीजनिर्मिती केंद्रातून वीजपुरवठा नियमित सुरू असल्याने ग्राहकांना फटका बसलेला नाही. या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

Story img Loader