उपराजधानीतील दोन भागात गोवरचा उद्रेक झाला असून हळूहळू संक्रमण वाढताना दिसत आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये एकही प्रौढ रुग्ण नाही. सगळेच रुग्ण लहान वयाचे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- घृणास्पद! स्वत:च्या दोन मुलींवर बापाचा अत्याचार, नराधमाला दुहेरी जन्मठेप

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. लसीकरणातून तो टाळता येतो. पाच वर्षांखालील मुलांमध्ये प्रामुख्याने तो आढळतो. परंतु काही प्रमाणात प्रौढ रुग्णांनाही या आजाराचे संक्रमण होते. या आजाराच्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, वाहनारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ यापैकी एक वा जास्त लक्षणे आढळतात. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते.

हेही वाचा- ‘बुलेट’सह हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला नवरीने शिकवला असा धडा…

दरम्यान, उपराजधानीत आजपर्यंत गोवरचे एकूण ३४ रुग्ण आढळले. त्यापैकी तीनहून जास्त रुग्ण आढळणाऱ्या मोमीनपुरा आणि गरीब नवाज नगरात आजाराचा उद्रेक नोंदवला गेला. शहरातील दहा झोनपैकी सात झोनमध्ये कमी-अधिक संख्येने नोंद झाली आहे. शहरात आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये एकही प्रौढ नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. सध्या महापालिकेच्या १४ पथकांकडून उद्रेकग्रस्त भागात घरोघरी सर्वेक्षण करून ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. या सगळ्याच मुलांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.

हेही वाचा- होळीनिमित्त पुण्याहून नागपूरसाठी विशेष रेल्वेगाडी

शहरात वर्षनिहाय आढळलेले गोवरचे रुग्ण

वर्ष – रुग्ण

२०२१ ०२
२०२२ ११
२०२३ ३४
एकूण ४७

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in measles cases in nagpur mnb 82 dpj