अनिल कांबळे
नागपूर : बलात्कार आणि हत्याकांडासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बालगुन्हेगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र पहिल्या तर मध्यप्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून मिळाली आहे.
देशात बालगुन्हेगारांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीतून बाहेर काढून समाजाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी केंद्र-राज्य स्तरावर सकारात्मक प्रयत्न केल्या जातात. या उपक्रमासाठी कोटय़वधींचा निधी राज्य सरकारला दिला जात असताना शासकीय अधिकारी-कर्मचारी त्या पैशाचा योग्य वापर न करता गैरव्यवहार करताना दिसतात. त्यामुळे बालगुन्हेगारी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात ३० हजार ५५५ बालगुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वाधिक बालगुन्हेगार महाराष्ट्र राज्यात असून ४ हजार ४०४ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश राज्य असून ३७९५ बालगुन्हेगार असल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान (३०६३) आहे. महाराष्ट्रात चोरी, घरफोडी, दरोडा आणि लुटमार यामध्ये सर्वाधिक बालगुन्हेगार असल्याची नोंद आहे. मात्र, खून, बलात्कार सारख्या गुन्ह्यातही बालगुन्हेगाराच्या संख्येतही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा >>>यवतमाळचा ‘बोधिसत्व’ वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये; नॅशनल जिओग्राफिक’द्वारे लघुपटाची निर्मिती
हत्याकांडाच्या गुन्ह्यात मुलांसह मुलींही अग्रेसर
गुन्हेगारांच्या टोळय़ा किंवा कुख्यात गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारी जगताकडे वळतात. मोठय़ा गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर बालगुन्हेगार खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही सहभागी होता. १२८६ अल्पवयीन मुलांवर खून केल्याचा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ९७९ मुले ही १६ ते १७ या वयोगटातील आहेत. हत्याकांडासारख्या गुन्ह्यात मुलांसह २० मुलींचाही समावेश असल्याची धक्कादायक सत्य समोर आले आहे. हत्याकांडात महाराष्ट्रातील सर्वाधिक (१५४) बालगुन्हेगारांची नोंद आहे तर दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश (१२०) राज्य आहे.
हेही वाचा >>>मोठी बातमी! सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर
१२३९ मुलांवर बलात्काराचा गुन्हा
’बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात वयस्क आरोपींची संख्या जास्त आहे. तसेच अल्पवयीन आरोपींसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत.
’बलात्काराच्या गुन्ह्यात १२३९ बालगुन्हेगार अडकले आहे. १६ ते १७ या वयोगटातील तब्बल ९८१ मुलांनी बलात्कार केल्याची नोंद पोलिसांनी केली. या वयोगटातील आरोपींकडून बलात्कार पीडितांमध्ये अल्पवयीन मुलींसह महिलांचाही समावेश आहे.
’राजस्थान (२२६), मध्यप्रदेश (२३७)
आणि महाराष्ट्रात (१२३) बालगुन्हेगारांचा समावेश आहे.
’बलात्कार, हत्याकांडांमध्ये लक्षणीय सहभाग
’महाराष्ट्र पहिल्या तर मध्यप्रदेश दुसऱ्या स्थानावर
’राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल
महाराष्ट्रात चोरी, घरफोडी, दरोडा आणि लुटमार यामध्ये सर्वाधिक बालगुन्हेगार असल्याची नोंद आहे. खून, बलात्कार सारख्या गुन्ह्यांतही बालगुन्हेगाराच्या संख्येतही राज्य पहिल्या स्थानावर आहे.