बुलढाणा : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. सध्या कामावर बारा हजारांवर मजूर असून कामांची मागणी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर ही वाढ झाल्याचे दिसून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूका गोरगरीब, मजूर, कामगार, लघु व्यावसायिक यांच्याकरिता रोजगार व चांगल्या कमाईची संधी असते. लहान कामेच नव्हे रॅली, जाहीर सभा, रोड शो मध्ये सहभागाचा चांगला लाभ होतो. दिवसांच्या बोलीवर चांगले ‘पॅकेज’ मिळते. त्यामुळे प्रचार काळात रोहयो कामावरील मजुरांची संख्या रोडावली होती. सध्या रोहयो वरील अकुशल मजुरांना २९७ रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाते. या तुलनेत निवडणूक हंगामात केलेल्या ‘कामाची’ यापेक्षा जास्त ‘मजुरी’ मिळते.

आणखी वाचा-अमरावती : पंजाबमधील भीषण अपघातात चिखलदरा तालुक्‍यातील चारजण ठार

यामुळे प्रचार काळात रोहयो वरील मजूर उपस्थिती रोडावली होती. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला मतदान पार पडले. त्याकाळात २७ तारखेला १३ तालुक्यातील कामावर ८९४७ मजूर उपस्थित होते. यानंतर मात्र कामाची मागणी वाढली. क्रमाक्रमाने यात वाढ होत गेली असून आज ६ मे रोजी मजुरांची संख्या तब्बल १२ हजारांवर (१२,०६०) गेली आहे. सध्या शेतीची कामेही नाही.

परिणामी, मजूर संख्येत व कामातही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायत अंतर्गत १७९६ कामे सुरू आहे. मेहकर ६१ कामे, खामगाव ३६ व मलकापूर ३४ हे तालुके आघाडीवर आहेत. सध्या प्रामुख्याने सिंचन विहिरी, घरकुल, वृक्षारोपण, फळबाग लागवड, गोठे, रेशीम लागवड, रस्ते ही कामे सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in number of workers under employment guarantee scheme after lok sabha elections scm 61 mrj