नागपूर : विकास कामांमुळे शहरातील अतिसूक्ष्म धूलिकणांचा आलेख वाढत असतानाच दिवाळीच्या फटाक्यांनी या प्रदूषणात भर घातली आहे. केवळ एका हवा गुणवत्ता मापक स्थानकाच्या आधारावर दिवाळीच्या दिवशी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १६९ वर गेला आहे. शहरातील इतरही स्थानकाची माहिती घेतली असती तर हा निर्देशांक २००पेक्षाही अधिक असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपराजधानीतील प्रदूषणाची पातळी इतर शहरांच्या तुलनेत मध्यम विभागात मोडणारी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इमारतीवर लावलेल्या प्रदूषण मापक यंत्रातून दर्शवण्यात आलेले प्रदूषणाचे प्रमाणच यात मोजण्यात आले. विशेष म्हणजे, मंडळाची इमारत ज्या परिसरात आहे, त्याठिकाणी प्रदूषण कमी आहे. शहरातील उर्वरित केंद्राची माहिती यात नाही. सर्वच केंद्रावरील प्रदूषणाचे प्रमाण यात घेतले असते तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षाही अधिक राहिला असता. महाल, गांधीबाग, सदर या परिसरात फटाके अधिक फोडले जातात. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील या परिसरात अधिक असते. याठिकाणी असलेल्या प्रदूषण मापक यंत्रावरून प्रदूषणाचे मोजमाप घेतले असते तर कदाचित हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० पर्यंत गेला असता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बुधवारी शहरात सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पोलीस खात्याच्या वतीने न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची आठवण करून देण्यात आली. त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. धनत्रयोदशीपर्यंत शहरात फटाके फोडले गेले नाहीत, पण नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांचा आवाज कायम होता. न्यायालयाचा  निर्णय चांगला असला तरीही जनजागृती व अंमलबजावणीवर अधिक भर द्यावा लागेल, असे ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले.