चंद्रपूर: दिवाळीत चंद्रपूर शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी हिवाळा सुरू औद्योगिक प्रदुषणात वाढ झालेली आहे. दिवाळीच्या रात्री आणि सोमवार १३ नोव्हेंबर व मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी कॅम्पसमधील हवेचा दर्जा निर्देशांक २७० वर पोहोचला आहे. तर १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेचा दर्जा निर्देशांक ४५५ होता.
प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना असतानाही शहर आणि जिल्ह्यात क्षमतेपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासोबतच हवेतील प्रदुषणात देखील वाढ झालेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार हवेचा दर्जा निर्देशांक ० ते ५० च्या दरम्यान असल्यास तो चांगला, ५० ते १०० संतुलित, १०१ ते १५० संवेदनशील, १५१ ते २०० त्रासदायक आणि २०१ ते ३०० अस्वास्थ्यकर मानले जाते. तसे पाहता, येथील एमआयडीसी संकुलातील उद्योगधंदे, सीएसटीपीएसमध्ये दररोज हजारो मेट्रिक टन कोळसा जाळल्याने चंद्रपूर जिल्ह्याची देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्यांमध्ये गणना होते, चंद्रपूरच्या कोळसा खाणींमुळे वाढते प्रदूषण, घुग्घुस. , बल्लारपूर संकुल आणि गडचांदूर संकुलातील सिमेंट कंपन्या. तेव्हापासून जिल्हा प्रदुषणात अव्वल राहिला आहे.
हेही वाचा… वणव्याच्या धुरातून किरणोत्सर्गाचा धोका; ‘लीबनिझ इन्स्टिटय़ूट फॉर ट्रोपोस्फेरिक रिसर्च’चा निष्कर्ष
दिवाळीच्या काळात आणि आज जिल्ह्यात प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाढत्या वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण बंदी घातली असतानाही दिवाळीच्या दिवशी फटाक्यांची विक्री आणि रात्री फटाक्यांच्या आवाजाने कानाच्या पडद्याला त्रास होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदुषणात मोठी वाढ झालेली आहे. रात्री आठ ते दहा या वेळेनंतर फटाके फोडण्यास सक्त मनाई असतांना देखील फटाके फोडले जात आहे. मात्र निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त फटाक्यांचा आवाज चंद्रपूर शहर व जिल्ह्यात रात्रभर गुंजत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली होती. रात्री दहा वाजेपर्यंतच फटाके वाजवू द्या, असे आवाहन महापालिकेने करूनही रात्रभर फटाके सुरूच होते. असे असतानाही कुठूनही कारवाई झाल्याची माहिती नाही. वाढल्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात त्वचा, श्वसन, ऱ्हदयरोग, केस गळणे, दमा तसेच इतर आजार बळावले आहेत.
फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदुषणात वाढ झाली असली तरी या काळात घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी, चंद्रपूर वीज केंद्र या सह जिल्ह्यातील इतरही औद्योगिक कारख्यान्यातून प्रदुषणात भर घातली जात आहे. त्यामुळे चंद्रपूरातील माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले आहे.