नागपूर: वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन, इतर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अनेक जिल्ह्यात प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे. मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या चंद्रपुरपेक्षाही नागपूरचे प्रदूषण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू आहे. त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. नागपूर शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून लक्षात आले आहे.

हेही वाचा… भाताला प्राधान्यच, पण हरभरालाही पसंती; गोंदिया जिल्ह्यात १.२६ लाख हेक्टरमध्ये रब्बी पिकांचे नियोजन

ऑक्टोबर महिन्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो. त्यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाढत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारी नुसार ३१ पैकी २१ दिवस प्रदूषण आढळले.

निर्देशांपेक्षा जास्त प्रदूषण

०-५० निर्देशांक चांगला मानल्या जातो. हा निर्देशांक इथे एकाच दिवस होता. मात्र, ५१-१०० निर्देशांक समाधानकारक किंवा साधारण प्रदूषित मानला जातो. येथे असे नऊ दिवस होते. नागपूरमध्ये मात्र ह्यापेक्षा जास्त प्रदूषण आढळले. मागील महिन्यात ३१ पैकी १९ दिवस निर्देशांक १००-२०० ह्या प्रदुषित श्रेणीत होता तर दोन दिवस निर्देशांक २००-३०० ह्या अति प्रदूषित श्रेणीत होता. ह्या प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग्याला हानिकारक तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.

प्रदूषणावर नियंत्रण

प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उदयोगांणी प्रदूषण रोखणे, नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रशासनाने कडक अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण होऊ शकेल, असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in pollution in october pollution for 21 days out of 31 days in nagpur rgc 76 dvr