चंद्रपूर: हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. धुके, थंडी आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होत असल्याने प्रदूषणात वाढ होते. हिवाळ्याच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपूरच्या प्रदूषणाचे दिवस वाढले असून ३१ दिवसांपैकी ३१ दिवसही प्रदूषण आढळले आहे. मात्र, हे प्रदूषण जीवघेणे व धोकादायक नसल्याने ही बाब चंद्रपूरकरांसाठी समाधानकारक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन, कोळसा खाणी, इतर उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे अनेक जिल्ह्यांत प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले होते ते पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात मोठी घट झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी धूलिकण २.५, १०, ओझोन, कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. ०-५० निर्देशांक चांगला, ५१-१०० समाधानकारक, १००-२०० साधारण प्रदूषित, २००-३०० जास्त प्रदूषित, ३००-४०० अति प्रदूषित तर ४००-५०० निर्देशांक धोकादायक मानला जातो.

हेही वाचा – बुलढाणा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, माजी मंत्री सुबोध सावजींचे राज्यपालांना साकडे; म्हणाले, “कायदा सुव्यवस्था लयास…”

चंद्रपूरचे २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यांतील ३१ दिवसांपैकी ३१ दिवसही प्रदूषण आढळले आहे. १४ दिवस समाधानकारक, १७ साधारण प्रदूषित आढळले आहे. तर २०२२ मध्ये ३१ दिवसांपैकी २३ दिवस प्रदूषण आढळले होते. ८ दिवस चांगले, १३ दिवस समाधानकारक, ८ दिवस साधारण प्रदूषण आढळले होते.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन…

प्रदूषणामुळे रोगामध्ये वाढ

प्रदूषणामुळे श्वसनाचा रोग, दमा, ब्रॉकायटिस, टीबी, हृदयरोग आणि मानसिक रोग, त्वचेचे रोग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणाला वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे असल्याचे प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in pollution of chandrapur during winter polluted days increased but hazardous pollution decreased rsj 74 ssb
Show comments