यवतमाळ: जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या ११ महिन्यांत तब्बल ७९७ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांत ३८० व्यक्तींनी जीव गमावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. अनेकदा दुचाकी वाहनचालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालवितात. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ७९७ रस्ते अपघात झाले. त्यात ३८० जणांचा मृत्यू झाला तर, ४९४ जण जखमी झाल्याची नोंद जिल्हा वाहतूक शाखेकडे आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात ६३ अपघात झाले त्यात २५ जणांचा मृत्यू तर ४४ जण जखमी झाले. फेब्रुवारीत ८६ अपघातात ३९ जणांचा मृत्यू तर ४७ जण जखमी झाले. मार्चमध्ये ९३ अपघातात ४६ जणांचा मृत्यू, ५० जखमी, एप्रिल ८४ अपघात, ४१ मृत्यू, २७ जखमी, मे ७८ अपघात, ४१ ठार, ३६ जखमी, जून १०१ अपघात, ५२ मृत्यू तर ४० जखमी, जुलै ५१ अपघात, ३३ ठार, २२ जखमी, ऑगस्ट ७२ अपघात, २७ ठार, ४० जखमी, सप्टेंबर ६२ अपघात, ३३ ठार, ६३ जखमी, ऑक्टोबर ४३ अपघात २४ ठार, ३० जखमी तर नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांची नोंद करण्यात आली. त्यात २७ जण ठार झाले तर ३४ जण जखमी झाले.

हेही वाचा… मुंबईतून कामकाज करणाऱ्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस, कारण काय? वाचा…

चालू वर्षात जून महिन्यात सर्वाधिक १०१ अपघातांची नोंद झाली. २०२२ मध्ये वर्षभरात एक हजार २०९ अपघात झाले होते. त्यात ४१६ जणांचा मृत्यू झाला होता तर, ४०० वर व्यक्ती जखमी झाले होते. सर्वाधिक २११ अपघात यवतमाळ उपविभागात नोंदविण्यात आले आहे. या अपघातांत ९९ जणांनी जीव गमावला. पांढरकवडा उपविभागत १७९ अपघात ५६ मृत्यू, वणी १२२ अपघात ७८ मृत्यू, पुसद ८२ अपघात ३३ मृत्यू तर दारव्हा उपविभागात १६० अपघातांत ८१ जणांच मृत्यू झाल्याची नोंद वाहतूक विभागाने घेतली आहे.

दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे, यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृतीसह दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, तरीही त्याकडे कानाडोळा केला जातो. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सिटबेल्टचा वापर केल्यास जीव वाचू शकतात, मात्र चारचाकी वाहनधाकर राष्ट्रीय महामार्गावरही सिटबेल्ट वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

यवतमाळची वाहतूक विस्कळीत

यवतमाळ शहराची वाहतूक कायम विस्कळीत आहे. शहराच्या चारही बाजूंनी रस्ते फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी व्यापल्याने शहरातून वाहन चालविताना कसरत करावी लागते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. मात्र वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in road accidents 797 accidents in 11 months in yavatmal 380 people lost their lives nrp 78 dvr
Show comments