शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात दोन वर्षांत २७ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले. त्यानंतरही येथील रुग्णांना सर्वच औषध मोफत मिळत नसल्याने नातेवाईक औषधांसाठी खासगी औषधालायकडे पायपीट करत आहे.
हेही वाचा- गडचिरोलीतील सूरजागड लोहखाणीचा विस्तार वादात; उच्च न्यायालयात याचिका
माहितीच्या अधिकारात प्राप्त तपशीलानुसार
मेडिकलला २०२०-२१ या आर्थिक वर्षात १६६ कोटी ३१ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. २०२१-२२ मध्ये हे अनुदान वाढून १९२ कोटी ८१ लाख ८२ हजार रुपयांवर गेले. तर २०२२-२३ मध्ये हे अनुदान १९३ कोटी ६४ लाख २५ हजार रुपये झाले दरम्यान, अनुदान वाढल्यावरही येथील रुग्णांना बाहेरून औषध आणावी लागत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार प्रश्न उपस्थित करत आहेत.