नागपूर : राज्यात महिलासंदर्भातील गुन्हे सातत्याने नोंदवल्या जात असून महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग आणि छेडखानीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून त्या पाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. परंतु, राज्यातील महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार आणि विनयभंग, छेडखानीच्या घटना लक्षात घेता सरकारचा दावा फोल ठरत आहे. मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात मुंबईत विनयभंग, छेडखानीच्या १ हजार २५४ घटना घडल्या आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे. याच कालावधीत ५४९ महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येसुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

हेही वाचा – भाजपाच्या ओबीसी नेत्यांचा फडणवीसांवर विश्वास नाही का? आश्वासनानंतरही मोर्चासाठी नागपुरात बैठक

पुण्यात छेडखानी केल्याच्या ३६४ घटना घडल्या आहेत, तर १२४ महिलांवर बलात्काराचे केल्याचे गुन्हे दाखल आहेत. मुंबईनंतर राज्यात पुण्यात सर्वाधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही महिला सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत ३०४ तरुणी-महिलांच्या छेडखानीच्या घटना घडल्या आहेत. तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तीनेशवर मुली आणि तरुणींना फूस लावून किंवा वेगवेगळी आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

शाळकरी विद्यार्थिनी सर्वाधिक पीडित

विनयभंग, शेरेबाजी किंवा छेडखानीच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. टवाळखोर आणि टारगट युवकांचा विनयभंगाच्या आरोपींमध्ये मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांवरही विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस ठाण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारी पोलीस दाखलच करतात असे नाही. समाजात बदनामी होण्याची भीती दाखवून पोलीस गुन्हा दाखल करण्यापासून तरुणींना परावृत्त करतात. अनेकदा असे गुन्हे दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करतात, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ भरती : नवीन १७० जागांसाठी जाहिरात

राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होणे गंभीर आहे. बलात्कार-विनयभंगाच्या प्रकरणांची राज्य महिला आयोग तातडीने दखल घेते. पोलीस विभागाने गांभीर्य दाखवून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. जेणेकरून येत्या काळात महिलांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होईल. – आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग.