चंद्रपूर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना वरोरा मतदार संघातील सर्वात कमी उंचीच्या ताराबाई महादेव काळे या ६१ वर्षीय अपक्ष उमेदवार चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे ताराबाईंची ही सातवी निवडणुक असून त्यांची उंची जेमतेम ३ फुट ४ इंच इतकीच आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्या प्रचारात सहभागी झालेल्या आहेत.

जनतेचे प्रश्न निकाली लागावे, समाजातील शेतकरी, महिला आणि गरजूंना न्याय मिळावा, याकरिता शेतकरी कुटुंबातील तारा महादेव काळे रिंग गणात आहेत. विशेष म्हणजे वरोरा मतदार संघात एकूण १८ उमेदवारांमध्ये त्या एकमेव महिला उमेदवार आहेत.त्यांची उंची जेमतेम ३ फूट ४ इंच आहे. त्यामुळे ताराबाई या राज्यात सर्वात कमी उंचीच्या उमेदवार असाव्यात अशी चर्चा निवडणुकीच्या आखाड्यात सुरू झाली आहे. ताराबाईंनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली. निवडून आल्यास गरिबांकरिता असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणार, आयुष्मान भारत, आरोग्य विमा, पीकविमा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना या अजूनही जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या आजही फक्त कागदावरच आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ताराबाईंनी आपल्या स्टाईलमध्ये वचननामा तयार केलेला आहे.

3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका
deputy chief minister validity loksatta
विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?

हेही वाचा…५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…

त्यामध्ये विविध मुद्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यांत बेरोजगारांची मोठी फौज आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, हे आपले प्राधान्य असेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. महिलांवरील अत्याचार, पिळवणूक आणि जबरीने मालमत्ता बळकाविणे या गोष्टींवर आळा घालण्याकरिता मी प्रयत्न करेल आणि शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठी लढेन, असे त्यांनी आपल्या वचननाम्यात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ताराबाईंनी आतापर्यंत सात वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. त्यांना १९९४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार मते मिळाली होती. उंचीने लहान असल्यामुळे बऱ्याच वेळा निवडणूक प्रचारात अडथळा निर्माण होतो. मात्र, त्याची तमा न बाळगता त्यांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवत निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला. मतदारांनी आपली उंची बघून नाही तर काम बघून मतदान करावे असे आवाहन ताराबाईंनी केले आहे. शहर व ग्रामीण भागात त्यांचा प्रचार सुरू असून या मतदार संघातील विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

Story img Loader