वर्धा : वैद्यकीय शिक्षणाच्या विविध शाखा आहेत. त्यात होमिओपॅथी ही शाखा पण स्वतंत्र स्थान राखून आहे. या शाखेचे जनक जर्मनी येथील डॉ. सॅम्यूएल हणीमन हे होत. आधुनिक वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असतांनाच विविध शाखाचा त्यांनी अभ्यास केला. त्याकाळी उपचार खूप वेदनादायी होत असत. तेव्हा मुळाशी जात हणीमन यांनी स्पष्ट केले की आपल्या विचार, भावना, संवेदनेचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. त्याचीच परिनीती म्हणजे आपल्यास आजार जडतो. म्हणून मानसिक लक्षनांचा अभ्यास करीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व रोगी रोगमुक्त करणे, असे तंत्र विकसित केले. त्यास होमिओपॅथी मान्यता मिळाली, असे डॉ. आनंद गाढवकर सांगतात.

या शास्त्राच्या अभ्यासक, डॉक्टर व हितचिंतक मंडळींनी एकत्र येत होमिओपॅथी भवन उभे करण्याची भूमिका मांडली. ती आता प्रत्यक्षात साकारली आहे. वर्धेलगत सालोड येथे हे भवन साकारले आहे. या बैद्यकीय प्रणालीबाबत अभ्यास तसेच चर्चा घडवून आणण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरेल. भारतात असे या शाखेचे हे पहिलेच भवन असल्याचे सांगण्यात येते. होमिओपॅथीक मेडिकल असोसिएशनतर्फे याची उभारणी झाली आहे.

हणीमन जयंती दिनी या भवनाचे लोकार्पण झाले. या प्रसंगी पदमश्री डॉ. विलास डांगरे, आमदार अभिजित वंजारी व अँड. शीतल पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. डांगरे यांनी त्यांना प्राप्त पद्मश्री सन्मान होमिओपॅथीसाठी कार्यरत सर्व अभ्यासू डॉक्टरांना समर्पित केला. आमदार वंजारी यांनी या भवनाच्या  विस्तार व संशोधन कार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

होमिओपॅथी शिबीरे या भवनात आयोजित करावी. त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे मत उपसरपंच आशिष कुचेवार यांनी व्यक्त केले. प्रस्ताविकातून डॉ. अनिल लोणारे यांनी भवन उभारण्याचे कार्य नमूद केले. अहवाल वाचन डॉ. दत्ता कुंभारे व डॉ. रवी देशमुख यांनी केले. डॉ. शुभांगी निमकर, डॉ. मिलिंद  वासेकर, डॉ. आनंद गाढवकर व डॉ. सुचित्रा कुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्र सांभाळले.

आयोजनात डॉ. रेणुका गाढवकर, प्रशांत खातदेव, विनय डहाके, निखिल ताल्हन, स्नेहल ताल्हन, हर्षल खासबागे, साक्षी वानखेडे, अमृता चौधरी रेखा खैरनार व अन्य डॉक्टरांनी योगदान दिले. या भवनाचा विस्तार करीत भव्य मेडिकल वाचनालय उभे करण्याचा संकल्प आयोजक होमिओपॅथी संघटनेने सोडला आहे.