७२व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा समारोप

नागपूर : जग करोनाच्या विळख्यात सापडला असताना लशीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरिकेने नकार दिला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करत आपल्याला कच्चा माल मिळवून दिला. भारतीय औषधनिर्माण क्षेत्राने सर्वात आधी लस तयार केली आणि देशभरात लशीचे वेगाने वितरण करून भारतीयांना मोफत लस उपलब्ध करून दिली. भारतीय लशीने केवळ भारतीयांचेच नाही तर १०६ देशांतील लोकांचे प्राण वाचवले. संशोधन आणि निर्मिती अशा दोन्ही क्षेत्रांत भारतीय फार्मा क्षेत्राने जगाला आपली शक्ती दाखवून दिली. भविष्यात जगाला औषधांचा पुरवठा करणारे केंद्र होण्याची भारतामध्ये क्षमता असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्तवतीने पार पडलेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा रविवारी समारोप झाला. नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. औषधी क्षेत्रात देशाला अधिक संशोधनाची तसेच कच्च्या मालासंदर्भातील परावलंबित्व कमी करण्याची आज गरज आहे. कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी ‘बल्क ड्रग पार्क’ तयार करण्यात येणार असून त्याकरिता महाराष्ट्रात जागेचा शोध सुरू आहे. औषधे व उपकरण निर्मितीसाठी ‘इको सिस्टीम’ तयार करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री या वेळी म्हणाले. कार्यक्रमाला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष टी. व्ही. नारायणा व वडलामुडी राव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर डोईफोडे यांनी केले तर ठराव वाचन टी. व्ही. नारायणा यांनी केले. या वेळी सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. मनीष आगलावे व प्रा. नियामत चिमथानावाला यांनी केले.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना

मिहानमध्ये गुंतवणुकीचे आवाहन

औषधनिर्मात्या कंपन्यांनी नागपूर मिहानमध्ये गुंतवणूक करावी. त्यांना आवश्यक असणारी मदत सरकारतर्फे केली जाईल, असे आवाहन फडणवीस यांनी केले. याशिवाय कंपन्यांच्या ठरावावरही सरकार सकारात्मक विचार करणार असून केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.