नागपूर : भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामीळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे. पश्चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार ते शनिवारदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. आज दूपारनंतर सर्वत्र पावसाला सुरुवात होईल. नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यासह मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाळासह व वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

pm narendra modi on dr manmohan singh death
Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
What is National Mourning?
National Mourning : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? काय आहेत निकष? सरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं बंद असतात?
manmohan singh passed away (1)
Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’

हेही वाचा >>>नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’

प्रामुख्याने बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणी काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. शनिवारी पाऊस विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. यादिवशी एकंदरित विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहायला मिळेल आणि सोमवारपासून मात्र थंडीत वाढ होईल. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून पीके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader