नागपूरच्या फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे देशातील सर्वांत उंच राहणार आहे. त्याचे उद्घाटन येत्या १५ ऑगस्टला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५० मीटर उंच कारंजे आणि त्यावरील डिजिटल स्क्रीन नागपूरचा इतिहास सांगणार असून या इतिहासाच हिंदीतील निवेदन गुलजार, इंग्रजीतून अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तर मराठीतून नाना पाटेकर यांच्या आवाजात राहील. हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही चार हजार आसन क्षमतेची राहणार असून फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा अकराशे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली.