नागपूर: भारत देशसोबत माझे फार जुने संबंध आहेत. भारत विज्ञानात काम करत असून भविष्यात भारत विज्ञानामध्ये महासत्ता बनेल, असा विश्वास नोबेल विजेत्या प्राॲडा योनाथ यांनी व्यक्त केला. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी प्राॲडा योनाथ नागपुरात आल्या असता त्यांनी जनसंवाद विभागात आयोजित एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात मी अनेकदा आली आहे. दिल्ली येथे संशोधन परिषदांना आली आहे. नागपुरात येण्याची संधी पहिल्यांदा मिळाली असून याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. नोबेल पुरस्कारासाठी नाव जाहीर झाल्यावर कसा अनुभव होता. याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, कुणीतरी आपली थट्टा करत आहे, असे वाटले. हा गमतीदार किस्सा त्यांनी रंगवून सांगितला.

हेही वाचा >>> अन् दोन अनाथ बालकांना मिळाली मायेची ऊब; एक स्वीडिश पालकांच्या छत्रछायेत तर दुसरा…

विज्ञानाकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. यात फार आवड असल्याशिवाय संशोधन करू शकत नाही. आपले संशोधन जस जसे कठीण होत जाईल तसेच आपले यश वाढत जाईल. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही फार सुंदर असून मला खूप आनंद होत असल्याचे प्रा.ॲडा योनाथ म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will become a science superpower in the future nobel laureate prof ada yonath nagpur news dag 87 ysh
Show comments