बुलढाणा: भारतावर १५० लाख कोटींचे कर्ज आहे. तरीही देश आर्थिक महासत्ता होईल, असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. बुलढाणा येथील महात्मा गांधी भवनात आज सोमवारी (दि. ८) विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या समारोपात प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था आहे. भारताचा ‘जीडीपी’ अमेरिका, चीन यांच्यापेक्षा जास्त आहे. करोनानंतरही भारताची आर्थिक भरारी कायम आहे. यामुळे आज आर्थिक व्यवस्थेत भारत जगात पाचव्या क्रमाकावर आहे, असा दावा डॉ. कराड यांनी केला.

navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

हेही वाचा – सावधान! ‘या’ राज्यांमध्ये आजपासून पुन्हा अवकाळी बरसणार!

संकल्प यात्रा काही ठिकाणी अडविण्यात आली, परत पाठविण्यात आली. याचे कारण विचारले असता हे तर महाविकासआघाडीचे काम असल्याचा आरोप त्यांनी केला. एका संस्थेने भूकबळीच्या संदर्भात दिलेल्या अहवालात भारत हा पाकिस्तानपेक्षा पुढे असल्याचे विचारले असता, मी हा अहवाल वाचला नसल्याचे डॉ. कराड म्हणाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, चैनसुख संचेती हजर होते.

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’मध्ये टाकाऊ बाटल्या, टायर, साहित्यांनी फुलवले सौंदर्य.. सेल्फी पाॅईंट सर्वांचे आकर्षण

इतर राष्ट्रांचे काय?

भारत २०४७ मध्ये प्रगत राष्ट्र बनणार याचा कराड यांनी पुनरुच्चार केला. मात्र तोपर्यंत इतर राष्ट्रे कितीतरी पुढे गेली असतील याचे काय, असा थेट सवाल केला असता त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली.