नागपूर : भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर चौधरी यांनी दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले. त्यांनी हवाई दलाच्या अनुरक्षण कमानच्या मुख्यालयाला भेट दिली आणि देशभरातील हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले.
अनुरक्षण कमानाचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी त्यांचे सोनेगाव हवाई तळावर चौधरी यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन दिवसीय कमांडर कॉन्फरन्समध्ये चौधरी यांनी भाग घेतला. त्यांनी देशभरातील वेगवेगळया हवाई दलाच्या देखभाल दुरुस्ती केंद्राच्या प्रमुखांशी चर्चा केली. तसेच वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली.
हेही वाचा…हवामान खात्याकडून विदर्भाला अवकाळीचा इशारा, ‘या’ तारखेदरम्यान असणार पाऊस
यावेळी विमान, हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये देश आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आत्मनिर्भर भारत अभियान आणि क्षमता वाढीसाठीवर त्यांनी भर दिला. दरवर्षी होत असलेल्या या कमांडर्स कॉन्फरन्सला विविध केंद्राचे प्रमुख उपस्थित होते. ही कॉफरन्स १४ मार्चला सुरू झाली आणि आज, शुक्रवारी समारोप झाला.